गजराजाशी मस्ती मगरीला पडली महागात, सोंडेला पकडताच असे केले… Video Viral
वन्य प्राण्यांशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या वेगाने व्हायरल होत आहे, यात हत्ती आणि मगरीतील संघर्ष दिसून आला. सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांच्या लढतीचे अनेक व्हिडिओज(Video) शेअर केले जातात आणि ते व्हायरल देखील होतात.
सध्या देखील इथे प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित एक व्हिडिओ(Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुळातच हत्ती हा एक विशाल पण शांत असा प्राणी आहे मात्र एकदा का त्याला राग आला की तो वाघालाही मागे सोडतो. या व्हायरल व्हिडिओतही असेच काहीसे घडल्याचेसमजत आहे. यातील दृश्ये तुम्हाला थक्क करतील. व्हिडिओत नक्की काय घडले ते जाणून घेऊया.
व्हायरल व्हिडिओमध्ये तीन हत्ती तलावाच्या काठावर पाणी पीत आहेत. हे दृश्य अतिशय शांत आणि सामान्य वाटत असले तरी अचानक पाण्यातून एक मगर बाहेर पडते. आपली ताकद वापरून तो हत्तीची लांब सोंड त्याच्या जबड्यात पकडतो. हे पाहून तिथे उभ्या असलेल्या इतर हत्तींनाही धक्का बसला आणि त्या हत्तीला मदत करण्याचा प्रयत्न केला. फ्रेममध्ये टिपलेले शेवटचे दृश्य खरोखरच मनोरंजक आहे.
मगरीने जेव्हा हत्तीची सोंड पकडली तेव्हा हत्तीही गप्प बसला नाही तर तो आपल्या ताकदीने आपली सोंड पाण्याच्या वर खेचतो आणि मगरीला जन्माची अद्दल घडवताना दिसून येतो. त्याने आपला राग पूर्णपणे व्यक्त केला आणि पाण्यात आपली सोंड जोमाने हलवू लागला. हत्तीची ताकद आणि राग पाहून मगरीला आपली पकड कमकुवत करावी लागली.
शेवटी तो हत्तीची सोंड सोडतो, पण हत्ती या संधीचा फायदा घेत मगरीला पुन्हा त्याच्या शक्तीची जाणीव करून देतो. पुढे व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की हत्तीने मगरीला पूर्णपणे आपल्या शक्तीचा बळी बनवले. त्यांनी मगरीला पाण्यात टाकून तिची अवस्था बिकट केली. हत्तीची सोंड आणि ताकद यांनी मगरीला पूर्णपणे पराभूत केले. शेवटी मगर आपली हार मनात तिथून गुपचूप निघून जाते.
हत्ती-मगरीतील या संघर्षाचा व्हिडिओ @anytimemothernature नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले असून हजारोंनी व्हिडिओला लाइक्सदेखील दिले आहेत. तसेच काहींनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिरक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जंगलाचा खरा राजा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भावाने त्याला चिखलात गाडले”.
हेही वाचा :
‘लाडकी बहीण’साठी सरकारचा मोठा निर्णय; तीन कोटी खर्चून करणार ‘हे’ काम
मदतीसाठी गेलेल्या व्यक्तीसोबत म्हशीने असे काही केले की… पाहूनच आवाक् व्हाल; Video Viral
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना; ‘या’ तारखेला UPI सेवा राहणार बंद