कोट्यवधी पीएफ खातेधारकांना होळीपूर्वीच मिळणार मोठी गुड न्यूज!

देशभरात ईपीएफओचे 7 कोटी खातेदार आहेत. ईपीएफओकडून चालू आर्थिक वर्षात खातेधारकांना मोठं गिफ्ट(good news) मिळण्याची शक्यता आहे. एम्पलॉई प्रॉविडंट फंड ऑर्गनायझेशनच्या केंद्रीय ट्रस्टीजची येत्या 28 फेब्रुवारी रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये ईपीएफओवर 8.25 टक्के व्याज देण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

यामुळे खाते धारकांना मोठा दिलासा मिळू शकतो. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 8.25 टक्के व्याज देण्यात आलं होतं. यंदा देखील व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे(good news). ईपीएफओवर किती व्याज दिलं जाणार याबाबत केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखलील सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या बैठकीत निर्णय होईल.

मागच्या वर्षी म्हणजेच 2023-24 साठी खातेधारकांना 8.25 टक्के, 2022-23 मध्ये 8.15 टक्के आणि 2021-22 मध्ये 8.10 टक्के व्याज मिळालं होतं. या चालू आर्थिक वर्षात ईपीएफओला त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळाला आहे. त्यामुळे खातेधारकांना देखील दिलासा मिळू शकतो.

सध्या ईपीएफओचे 7 कोटी खातेधारक आहेत. संघटित क्षेत्र विशेषत: खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांकडून ईपीएफओमध्ये रक्कम जमा केली जाते. या सर्व खातेधारकांचे लक्ष आता 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीकडे असणार आहे.

दरम्यान, पीएफमधील रक्कम नोकरी सुटणे, घर बांधणे, लग्न, मुलांचं शिक्षण या कारणासाठी काढता येते. या वर्षी खातेधारकांना किती टक्के व्याज मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा :

लाडकी बहीण योजना बंद होणार? ‘त्या’ चर्चांना CM फडणवीसांचा फुलस्टॉप!

आज अनेक शुभ संयोग; ‘या’ 5 राशींना लागणाल लॉटरी, मिळणार तिप्पट लाभ

पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा पपईचे सेवन