नववी ते बारावीच्या मार्क्सची एकत्रित गणना; बोर्डांच्या मूल्यमापनात समानता आणण्याचे नवीन प्रयत्न
बारावी बोर्डाच्या निकालाच्या पद्धतीत बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिक्षण मंत्रालयाला सादर झालेल्या अहवालानुसार, नववी ते बारावीच्या सर्व परीक्षा(exam) गुणांचा विचार करून एकत्रित मूल्यांकन करण्याची योजना आहे.
एनसीईआरटीच्या ‘परख’ युनिटने हा अहवाल सादर केला असून, यामध्ये सर्व शालेय बोर्डांच्या मूल्यमापन प्रक्रियेचा एकसमान दृष्टीकोन घेण्याची शिफारस करण्यात आली आहे.
या नवीन प्रक्रियेनुसार, 9 वीच्या गुणांना 15% वेटेज, 10 वीच्या गुणांना 20%, 11 वीच्या गुणांना 25% आणि 12 वीच्या गुणांना 40% वेटेज दिला जाईल. विद्यार्थ्यांचे मूल्यांकन रचनात्मक मूल्यांकनाच्या आधारावर होणार आहे, ज्यामध्ये सत्र परीक्षा, परीक्षा रिपोर्ट कार्ड्स, गटचर्चा आणि प्रकल्पांचा समावेश असेल.
सर्व शाळा मंडळांना या अहवालावर अभिप्राय देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत चर्चा करून गुणवत्ता सुनिश्चित करणारी नवी निकाल पद्धत तयार करण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा :
शिवरायांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेवर रितेश देशमुखची भावुक प्रतिक्रिया
कोकणातील दहीहंडीचा अनोखा थरार: ४० फूट खोल विहिरीत फोडण्याचा अनुभव, एकदा पाहाच Video
टेलिग्रामवर बंदी येणार? CEO पावेल दुरोवच्या अटकेनंतर केंद्र सरकारच्या तपासाची तयारी