दहीहंडी 2024: योग्य तारीख कधी? २६ की २७ ऑगस्टला?

श्रावण (Shravan)महिन्यात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा करणे म्हणजेच दहीहंडी फोडणे, या उत्सवाच्या तारखेबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम आहे. यंदा दहीहंडी नेमकी कधी फोडावी, हे जाणून घेण्यासाठी आपण पिठानुसार तपासले आहे.

पंचांगानुसार, यंदा श्रावण कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी २६ ऑगस्ट २०२४ रोजी आहे. या तिथीचा प्रारंभ पहाटे ३ वाजून ३९ मिनिटांनी होत आहे आणि २७ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री २ वाजून १९ मिनिटांपर्यंत सुरू राहणार आहे. हिंदू धर्मानुसार, श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २७ ऑगस्ट रोजी दहीहंडी फोडली जाते.

म्हणजेच यावर्षी दहीहंडी २७ ऑगस्ट २०२४ रोजी फोडली जाईल. महाराष्ट्रासह गुजरातमध्ये हा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा होतो आणि विविध शहरांमध्ये उत्सवाची तयारी सुरू आहे. महिला गोविंदा, मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. श्रीकृष्णाची ५२५१ वी जयंती यंदा साजरी केली जात आहे, त्यामुळे उत्सवाची तयारी एक विशेष महत्त्वाची आहे.

यंदा दहीहंडीच्या तयारीसाठी विविध कार्यकम आणि आयोजनं जोरात सुरू आहेत आणि हे उत्सव श्रीकृष्णाच्या जन्मदिवसाच्या आनंदात रंगलेले असणार आहेत.

हेही वाचा :

पंतप्रधान मोदी जळगावात ‘लखपती दीदीं’शी संवाद साधणार; भव्य मेळाव्याची तयारी अंतिम टप्यात

सकाळी हेल्दी आणि टेस्टी ड्रिंक्सचा समावेश केल्यास दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवणे सोपे होते..

“साबुदाण्याच्या एका मिश्रणासह तयार करा उपवासासाठी स्वादिष्ट आणि खमंग पदार्थ!”