श्री दत्त मंदिरात तिसऱ्यांदा दक्षिणद्वार सोहळा ;नृसिंहवाडी
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे(rain) आणि काही धरणांमधून होत असलेल्या वाढत्या विसर्गामुळे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांची पातळी दोन दिवसांत दहा ते बारा फुटांनी वाढली आहे. या वाढलेल्या पाण्यामुळे श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिराला पुन्हा एकदा पाण्याचा वेढा पडला आहे.
आज, २६ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता श्रींच्या मुख्य चरणावर पाणी आल्यामुळे यंदा तिसऱ्यांदा दक्षिणद्वार सोहळा पार पडला. श्रावण महिन्यातील सोमवार आणि गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने या दुहेरी सोहळ्याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला. भाविकांनी मंदिर परिसरातील दक्षिण द्वारात स्नान करून धार्मिक पर्वणीचा अनुभव घेतला.
संध्याकाळी श्रींची उत्सव मूर्ती परत पूज्य नारायण स्वामी मंदिरात आणण्यात आली आणि दत्त देवस्थानामार्फत नित्य कार्यक्रम सुरू झाले. कृष्णा नदीची पूजा सेवेकरी मंडळींनी मंत्रपठणासह रात्री धुपारतीच्या वेळी केली.
कोकणात पडणाऱ्या पावसामुळे पंचगंगा आणि कृष्णा नद्यांमध्ये पाण्याची पातळी वाढत आहे, ज्यामुळे नदीकाठच्या शेतीचा काही भाग पाण्याखाली गेला आहे. देवस्थान समितीने नित्य पूजेचे साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवले असून, उद्या मंगळवारपासून श्रींच्या उत्सव मूर्तीवर दुपारी साडेबारा वाजता महापूजा होणार आहे. श्रावण महिन्यामुळे दत्त दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
हेही वाचा :
प्रकाश आंबेडकर यांची छगन भुजबळांना खुले आमंत्रण..
कोहलीने कसोटी संघाचे नेतृत्व आणखी काही काळ सांभाळायला हवे होते” – माजी कोच संजय बांगर
टेलिग्रामवर बंदीची शक्यता? दुरोवच्या अटकेनंतर भारत सरकारच्या हालचालींमुळे चिंता