6 वर्षानंतर दया पुन्हा दिसणार; ‘CID’चा दमदार कमबॅक, शो लवकरच चाहत्यांच्या भेटीला

प्रसिद्ध टीव्ही शो(tv show) ‘सीआयडी’ च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘सीआयडी’ पुन्हा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. निर्मात्यांनी गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत माहिती दिली की, सीआयडीचा प्रोमो लवकरच प्रदर्शित केला जाईल. सीआयडी तब्बल सहा वर्षांनंतर पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. निर्मात्यांनी शो प्रोमो लवकरच रिलीज होणार असल्याची घोषणा करण्यासाठी एक क्लिप शेअर देखील केली आहे.

वीस वर्षांहून अधिक काळ टीव्हीवर प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा हा शो(tv show) पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. गुरुवारी अपडेट शेअर करत निर्मात्यांनी सांगितलं की, या शोचा प्रोमो 26 ऑक्टोबर रोजी रिलीज केला जाईल. विशेष म्हणजे निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक क्लिपही शेअर केलीय.

ज्यात शोचे आवडते कलाकार शिवाजी साटम, आदित्य श्रीवास्तव आणि दया शेट्टी दिसत आहेत. दयानंद शेट्टीच्या काळ्या डोळ्यांच्या क्लोज-अप शॉटने क्लिपची सुरुवात होते. त्यानंतर मुसळधार पावसात एसीपी प्रद्युम्न पोलिसांच्या गाडीतून बाहेर येताना दिसतो. CID चे प्रसिद्ध थीम म्युझिक पार्श्वभूमीत वाजत आहे.

सीआयडी या गुप्तहेर नाटकात ‘इन्स्पेक्टर पंकज’ची महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता अजय नागरथ यानेही ही क्लिप सोशल मीडियावर शेअर केलीय. कॅप्शनमध्ये त्याने”तुम्ही उत्साहित आहात का? ” असं विचारलं आहे. यावरून शोच्या कलाकारांमध्येही याविषयी प्रचंड उत्साह असल्याचं दिसून येतंय. या पोस्टवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. सीआयडी परत आलीय. खूप उत्साहित आहे, अशी कमेंट एका चाहत्याने केलीय.

सीआयडी ही सोनी टीव्हीच्या हिट मालिकांपैकी एक आहे. 20 वर्षांचा रन पूर्ण करून मालिका 2018 मध्ये संपली होती. या मालिकेत काम करणारे कलाकार त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने घराघरांत पोहोचले होते. असाच प्रेक्षकांच्या आवडीचा असलेला शो सीआयडी पुन्हा एकदा परत टीव्हीवर दिसणार आहे. यामुळे शोमधील कलाकार अत्यंत उत्साही आहेत. त्यांच्यासोबत आता प्रेक्षक देखील उत्साही असल्याचं पाहायला मिळतंय. कलाकार शिवाजी साटम, आदित्य श्रीवास्तव आणि दया शेट्टी लवकरच पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येत आहेत.

हेही वाचा :

‘रोहित निगेटीव्ह कर्णधार असून…’, Live मॅचदरम्यान गावकसरांनी झापलं

दिवाळीत लक्ष्मीपूजन 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर रोजी?

विधानसभेआधी राजकीय घडामोडींना वेग; ‘या’ माजी मंत्र्यांचा शरद पवार गटात प्रवेश

मलायका अरोराच्या वाढदिवसाला अर्जुन कपूरची क्रिप्टिक पोस्ट