लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला नाही? लगेच करा ‘या’ नंबरवर कॉल

‘माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत दर महिना पात्र महिलांना 1,500 रुपये दिले (answering service)जातात. दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारकडून योजनेत समाविष्ट असलेल्या महिलांना चौथा आणि पाचवा हप्ता देण्यात आला. आता लाडक्या बहिणी सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहे.महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘माझी लाडकी बहीण योजना’ राबवली आहे.

‘माझी लाडकी बहीण योजना’ 2024 मध्ये सुरू करण्यात आली. 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत मिळते. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर (answering service)मीडिया रिपोर्ट्सनुसार, 15 डिसेंबरनंतर सहावा हप्ता मिळेल असे बोले जात आहे. कारण नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात यासंबंधित निर्णय होण्याची शक्यता आहे.लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्ही अंगणवाडीतही भरू शकता.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे न आल्यास काय करावे?

  • लाडकी बहीणीने स्वतःचे नाव लाभार्थ्यांच्या लिस्टमध्ये आहे की नाही , ते पाहावे.
  • नाव लिस्टमध्ये नसल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा.
  • आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे तपासून घ्यावे.
  • ऑनलाइन बँकींगच्या मदतीने खात्यात पैसे आले का, हे चेक करा.
  • जर यानंतरही तुम्हाला पैसे आलेच नसतील तर शेवटी 181 या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून तक्रार दाखल करा.

181 या हेल्पलाइन नंबरवर कॉल केल्यावर ‘लाडकी बहीण योजने’चा अर्ज करूनही पैसे का आले नाही याची चौकशी करा. मिळालेल्या माहितीनुसार पुढे अपडेट व्हा. जानेवारी (answering service)संपेपर्यंत जर लाडक्या बहीणींच्या बँकेत हप्ता जमा झाला. मात्र तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले नसतील तर या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून आपली तक्रार नोंदवा.

हेही वाचा :

थंडी परतणार! येत्या 24 तासात महाराष्ट्रातील वातावरण बदलणार

एक नाही तर तब्बल 9 आयपीओ खुले होणार; पुढील आठवड्यात कमाईची मोठी संधी!

‘विरोधी पक्षाचा पूर्ण सफाया, ६५ वर्षांत असं कधीच घडलं नाही…’, मविआ नेत्याचे सूचक वक्तव्य