लाडक्या बहिणींना या वर्षी २१०० मिळणार नाहीत आदिती तटकरेंचं महत्त्वाचं वक्तव्य

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी (sisters)बहीण योजनेत यंदाच्या अर्थसंकल्पात २१०० देणार असल्याची घोषणा आम्ही केलेली नाही, असं वक्तव्य आदिती तटकरेंनी केलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं आहे.लाडकी बहीण योजनेबाबत अनेक चर्चा होत होत्या. आतापर्यंत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळत आहे. या योजनेत २१०० रुपये कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष होते. दरम्यान, या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देऊ अशी घोषणा आम्ही केलीच नाही, असं वक्तव्य आदिती तटकरेंनी केलं आहे.

आदिती तटकरेंनी आज विधानभवनात लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. येत्या अर्थसंकल्पात किंवा अधिवेशनाच्या काळात २१०० रुपये देऊ, असं कोणतही वक्तव्य आम्ही कुठेही केलं नाही. आपण एखादी योजना जाहीर करत असतो. तेव्हा जाहीरनामा हा ५ वर्षांचा असतो. या (sisters)अर्थसंकल्पात २१०० रुपये देण्याची घोषणा आम्ही कुठेही केलेली नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पात एक विभाग म्हणून आम्ही आमचा प्रस्ताव शासनाजवळ ठेवला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या २१०० रुपयांबाबतची घोषणा अर्थसंकल्पात होण्याची शक्यता होती.मात्र, या अर्थसंकल्पात तरी लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये मिळण्याची शक्यता अत्यंत(sisters) कमी आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींची निराशा होणार असल्याची शक्यता आहे.लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र देण्यात येणार आहे. महिला दिनाचे औचित्य साधत त्यांना पैसे देण्यात येणार आहे. दोन्ही महिन्याचे हप्ते ७ तारखेपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होतील. असं आदिती तटकरेंनी सांगितलं आहे.
हेही वाचा :
सेमी फायनलवेळी पाऊस पडला तर हा संघ थेट फायनलमध्ये पोहचणार
कराड गँगच्या अमानवीय क्रूरतेचा आणखी एक मोठा पुरावा समोर!
बाबा वेंगाची नवीन भविष्यवाणी थक करणारी….