मुलाबरोबर गरबा खेळताना मृत्यू; धक्कादायक घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद; Video

गरबा खेळत असतानाच अचानक चक्कर येऊन खाली पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील चाकणमध्ये घडली आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ(Video) समोर आला आहे. व्हिडीओमध्ये छान नटून थटून नाचणारी ही व्यक्ती अचानक खाली कोसळते. त्यानंतर या व्यक्तीसोबत असलेला मुलगा नेमकं काय झालं हे पाहण्यास जातो तर सदर व्यक्तीची शुद्ध हरपल्याचं समजतं. मात्र अन्य व्यक्त मदतीला येईपर्यंत या माणसाने प्राण सोडल्याचं दिसून येतं.

ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्याचं नाव अशोक माळी असं आहे. नाचता नाचता अचानक भोवळ आल्याने अशोक मैदानातच पडतात. त्यानंतर काही क्षणांमध्ये त्यांचा मृत्यू होतो. अशोक यांच्या मृत्यूचं प्राथमिक कारण हृदय विकाराचा झटका असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अशोक हे एका लहान हे एका लहान मुलाबरोबर गरबा खेळण्यासाठी आले होते. अगदी छान गुजरातील पेहराव करुन नाचणाऱ्या अशोक माळी यांचा व्हिडीओ(Video) गरब्यासाठी आलेले तरुण आणि तरुणी मोबाईलमध्ये कैद करत होते. “घूंघट में चाँद होगा आँचल में चाँदनी” या गाण्यावर अशोक माळी आणि त्यांच्यासोबतचा मुलगा फेर धरुन नाचत होते.

एक ते दोन फेऱ्या मारुन झाल्यानंतर अशोक माळींना अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यांना आपला वेग कमी केला. मात्र पुढल्याच क्षणी तो कोसळून खाली पडले. त्यांना कोणी सावरायला जाण्याआधीच त्यांनी प्राण सोडल्याचं सांगितलं जात आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ…

चार दिवसांपूर्वीच जळगावमधील एका 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. गुरुवारी रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी हा प्रकार घडला होता. जळगावमधील पाचोरा येथे घडलेल्या या प्रकारात मरण पावलेल्या तरुणाचं नाव लखम रमेशनलाल वाधवानी असं आहे. हृयविकाराचा झटका आल्याने वाधवानीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. खासगी रुग्णालयात वाधवानीला दाखल करण्यात आलं असता त्याला मृत घोषित करण्यात आलं.

उत्साहाच्या भरात अनेकजण न थांबता बराच वेळ नाचतात त्यामुळे त्यांचा श्वास फुगतो याचा परिणाम हृदयावर होतो. नियमित व्यायम न करणाऱ्या, अचानक भरपूर हलचाल केल्याने दम लागणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराच्या झटक्याची शक्यात अधिक असते. बदलत्या जीवनशैलीमुळे आता कोणत्याही वयाच्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो असं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळेच गरब्याला जाताना आरोग्यवि,य़क काळजी घेणं गरजेचं असतं हे विसरता कामा नये.

हेही वाचा :

खुशखबर! अक्षर पटेल लवकरच होणार बाबा, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

काँग्रेसमध्ये प्रवेश करत थेट निवडणुकीत उतरली; विनेश फोगाट आघाडीवर की पिछाडीवर?

शूटिंगदरम्यान इमरान हाश्मी जखमी, 45 वर्षीय अभिनेत्याच्या मानेला झाली गंभीर दुखापत!