ठरलं! ‘या’ तारखेला मांडलं जाणार देशाचं बजेट; सर्वसामान्यांसाठी होणार मोठ्या घोषणा?

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन 23 जुलै रोजी संसदेत अर्थसंकल्प(budget) सादर करणार आहेत. केंद्र सरकारच्या शिफारशीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे लागले आहे.

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन केल्यानंतर मोदी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प(budget) असणार आहे. येत्या 23 जुलैला देशाचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. 22 जुलैपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार असून ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार असल्याची घोषणा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी केली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये सर्वसामान्यांना काय मिळणार?, याबाबत आता सर्वांनाच आशा लागल्या आहेत. तसेच नोकरदार वर्गाला कराच्या आघाडीवर काही प्रमाणात दिलासा आणि सवलती मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, अंतरिम अर्थसंकल्पामुळे त्यांची काहीशी निराशा झाली होती. आता या अर्थसंकल्पात नोकरदार वर्गाला करात सूट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

2024 च्या अर्थसंकल्पात भारतातील आयकर रचनेत सुधारणांचा समावेश अपेक्षित आहे. याचबरोबर शेतकऱ्यांसाठी देखील मोठे निर्णय घेतले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. एका प्रसिद्ध अहवालात यंदा आयकरात सवलत मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

याचा फायदा हा 5 लाख ते 15 लाख उत्पन्न असणाऱ्यांना होईल. सध्या या वर्गाला 5 ते 20 टक्के आयकर द्यावा लागत आहे. यामुळे या कररचनेत बदलाची अपेक्षा असणार आहे. यंदा सरकार (Modi 3.0 Budget 2024) पीएम शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन रकमेत वाढ करण्याचाही विचार करत असल्याची चर्चा आहे.

सध्या शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत सरकार दरवर्षी 6 हजार रुपये म्हणजेच दर चार महिन्यांनी 2000 रुपये देते. हीच रक्कम आता वार्षिक 8,000 रुपये केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निर्णयामुळे महिला शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य वाढवू शकते. तसेच ग्रामीण आवास योजनेतील राज्यांचा वाटा 50 टक्क्यांनी वाढविण्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे.

हेही वाचा :

रितेश-जिनिलियाने घेतला आयुष्यातील मोठा निर्णय

तीन संघटना एकत्र येऊन राज्यात तिसरी आघाडी? बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार?

‘मला खेळायचं…’, स्टार खेळाडूने निवृत्तीतून घेतला यू-टर्न? बोर्डाला केली अपील