उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, राऊतांच्या मागणी

विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, असा प्रश्न विचारला जात असतानाच(define announce)ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हेच मविआचे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल, असे सांगून टाकले. राऊतांच्या या विधानामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं(define announce) काम महाराष्ट्रानं पाहिलं आहे. तीनही पक्ष एकत्र लढले असले तरी लोकसभा निवडणुकीत आघाडी झालेलं मतदान हे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहुनही झाले आहे, असे राऊत यांनी सांगितले.

“बिन चेहऱ्याचं सरकार, हे अजिबात चालणार नाही. लोक स्विकारणार नाहीत. लोकांना चेहरा द्यावाच लागेल.” असे सांगत राऊतांनी (Sanjay Raut) उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, असे अप्रत्यक्षपणे सूचवले.

मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव खासदार संजय राऊत यांनी पुढे रेटले आहे. बिन चेहऱ्याने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मतदान मागणे हे धोक्याचे असल्याचे राऊतांचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाणार हा धोका आहे. या महाराष्ट्र आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे काम पाहिले आहे. लोकसभेला जे यश मिळाले, ते त्यांच्या चेहऱ्यामुळेच, असा दावा राऊतांनी केला. राऊतांच्या या विधानावरुन आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते काय प्रतिक्रिया देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मुख्यमंत्री पदासाठी आताच महाविकास आघाडीतील कुठल्याही नेत्यांनी स्वारस्य दाखवू नये. आम्ही सत्तेवर पाहिजे हे स्वारस्य असले पाहिजे. निवडून आलेले आमदार त्यावेळी मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतली. त्यावर आताच भाष्य करणे टाळले पाहिजे,”

हेही वाचा :

शेतकऱ्यांची सरकार, विमा कंपन्यांकडून थट्टा; गाजावाजा करत 1 रुपयांत पिक विमा, पण…

जीवनात यशस्वी व्हायचे आहे? आचार्य चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

लुटेरी दुल्हन! दोन राज्यांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर निघाली HIV पॉझिटिव्ह