धनंजय मुंडेंविरोधात मोठी कारवाईची मागणी; हायकोर्टात याचिका दाखल!

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी अजूनही फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलीस जंग जंग पछाडत आहेत. परंतु, त्यांचा शोध अजून तरी लागलेला नाही. याच दरम्यान (Political News)धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. यातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने (Political News)राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी या प्रकरणी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती.

यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआटी आणि न्यायालयीन चौकशी करण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार चौकशीला सुरुवात झाली असली तर या प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही फरारच आहेत.

दोन दिवसांपूर्वी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चातही मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी आणखी आक्रमक पावले उचलत आरोपींची बँक खाती गोठविण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. आरोपींची आर्थिक कोंडी करण्याच्या उद्देशाने ही कार्यवाही करण्यात येत आहे.

दरम्यान, इंडिया टुडेच्या वृत्तानुसार या प्रकरणी धनंजय मु्ंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मीक कराड यांच्या अटकेची मागणी होत आहे. मात्र कराड सध्या फरार आहे. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद काढून घेण्याची मागणी होत आहे. यासाठी आता थेट न्यायालयात क्रिमिनल रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. मयत संतोष देशमुख यांचे लहान बंधू धनंजय देशमुख यांनी हा मागणी न्यायालयाकडे केली आहे.

तपासात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत धनंजय देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची आणि वाल्मीक कराडला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी याचिकेत केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर याचिका दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा :

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून राज्याला 260 कोटींचा निधी”

रोहित शर्मा अन् विराट कोहली निवृत्ती घेणार?, काय म्हणाले रवी शास्त्री?


इचलकरंजीत धक्कादायक घटना: पुरुष सुरक्षारक्षकावर लैंगिक अत्याचार आणि हल्ला!