शरीर सुखाची मागणी, नकार देताच कटरने सपासप वार; 19 वर्षीय नराधमाचं अंगावर काटा आणणारं कृत्य

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका 36 वर्षीय महिलेसोबत झालेल्या निर्घृण (cutter)हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. शरीरसुखाची मागणी फेटाळल्यानंतर 19 वर्षीय तरुणाने या विवाहितेवर कटरने भयंकर वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर 280 टाके घालावे लागले आहेत. तिच्या मानेपासून ते मांडीपर्यंतच्या खोल जखमेमुळे ती मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अभिषेक तात्याराव नवपुते याला अटक केली आहे.

पीडित महिला शेतात काम करत असताना आरोपी अभिषेक नवपुते याने तिला फोन करून तिच्यासोबत जबरदस्तीची मागणी केली, तसेच तिच्या जावेच्या बाबतीतही अर्वाच्य बोलला. पीडितेने त्याचा फोन कट केला. संध्याकाळी ती शेतातून परत येत असताना आरोपीने पाठीमागून येऊन तिची वेणी ओढली आणि तिला जमिनीवर फेकले. त्यानंतर तिला काही कळायच्या आत त्याने चेहऱ्यावर धारदार कटरने वार केले. महिलेने ओरडण्याचा प्रयत्न (cutter)केला असता त्याने गळ्यावर वार केला आणि संपूर्ण शरीरावर सपासप वार केले. विशेषतः मानेपासून मांडीपर्यंत सव्वादोन फूट लांब वार केल्यामुळे तिच्या शरीराची अक्षरशः चिरफाड झाली.

या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून डॉक्टरांनी तिच्या शरीरावर तब्बल 280 टाके घातले आहेत. तिच्या उपचारांसाठी लागणारा दोराच 22,000 रुपयांचा लागला आहे. पीडितेने आपल्या अवस्थेबद्दल सांगताना असे म्हटले की, “माझ्यावर इतके वार झाले की डॉक्टरांना माझे अंग अक्षरशः गोधडीसारखे शिवावे लागले. या जखमांमुळे असह्य वेदना होत आहेत, पण रडूही शकत नाही. कारण डोळ्यांतून गळणारे अश्रू जखमांवर पडले तर आणखी आग होईल.”

महिलेची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तिच्या दोन लहान (cutter)मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी तिच्यावर आहे, मात्र उपचारासाठी पुरेसा पैसा उपलब्ध नाही.या घटनेनंतरही आरोपी अभिषेक नवपुते गावात बिनधास्त फिरत होता. पोलिसांनी त्याला अटक केली, मात्र त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप जराही दिसून आला नाही. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा :

चालय काय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार महाराष्ट्र घटनेनं हादरल

संतोष देशमुखांचे फोटो पाहून युवकाने केली आत्महत्या कुटुंबीयांना मोठा धक्का

‘या’ 3 तारखेला जन्मलेले लोक असतात भांडखोर; मात्र जोडीदाराची घेतात काळजी