उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. गोरेगाव पोलिसांना आणि मंत्रालयाला धमकीचा ईमेल मिळाला आहे. मंत्रालय, जेजे मार्ग पोलिस स्टेशन, गोरेगाव पोलिस स्टेशनला धमकीचे ईमेल आले आहेत. एकनाथ शिंदे शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीत आले असून आज दिल्लीहून मुंबईला परतणार आहे, त्यामुळे सुरक्षा दलांना सतर्क ठेवण्यात आले आहे. धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत.

एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकीची ही बाब गांभीर्याने घेतली जात आहे. कारण धमकीचा ईमेल मंत्रालय, जेजे मार्ग पोलिस स्टेशन आणि गोरेगाव पोलिस स्टेशन या तिन्ही ठिकाणी पोहोचला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत. गेल्या काही दिवसांत राजकीय नेत्यांना धमकीचे फोन आणि ईमेल आल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. गोरेगाव पोलिस स्टेशन आणि मंत्रालयाच्या गाडीवर बॉम्बस्फोटाचा धोका होता. गोरेगाव पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीने पाठवलेला ईमेल मिळाला होता. याशिवाय, मंत्रालय आणि जेजे मार्ग पोलिस स्टेशनलाही अशाच प्रकारची धमकी देणारी मेल मिळाली आहे. धमकी देणारा ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात तो एक बनावट कॉल मेल असल्याचे उघड झाले. गेल्या काही दिवसांत राजकीय नेत्यांना धमकीचे फोन आणि ईमेल आल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
दिल्लीतील शपथविधी सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे नेते दिल्लीत पोहचले आहे. याचबरोबर एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिन्ही नेते दिल्लीत आहेत. दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी हे तिघेही रामलीला मैदानावर पोहोचले आहेत. येथे तिन्ही नेते मंचावर एकत्र दिसले. एकनाथ शिंदे आज संध्याकाळी दिल्लीहून मुंबईला पोहोचणार आहेत, त्यापूर्वी सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.
हेही वाचा :
भारताविरोधात भिडण्याआधीच पाकिस्तानला मोठा धक्का हुकमी एक्का स्पर्धेबाहेर
आधी नटापटा, मग झिंज्या; महिलांच्या हाणामारीचा VIDEO व्हायरल!
जोडीदार निवडताना मुलांची ‘या’ मुलींना असते जास्त पसंती