धनंजय मुंडेंनी कृषीमंत्रीपद अन् पालकमंत्रीपद भाड्याने दिलं…

बीड जिल्हा सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. केज तालुक्यातील मस्साजोग येथील(Political updates) सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या हत्या प्रकरणात प्रामुख्याने ज्यांचं नाव घेतलं जात होत ते वाल्मिक कराड हे काल सीआयडीला शरण आले आहेत. त्यानंतर इतर तीन आरोपींचाही शोध सुरू आहे. दरम्यान, भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडचं नाव घेत धनंजय मुंडेंवर मोठा आरोप केला आहे.

मागच्या काळात(Political updates) धनंजय मुंडे हे दोनवेळा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांच्या या काळात हे पालकमंत्रीपद त्यांनी नाही तर वाल्मिक कराडने चालवल. तसच, त्यांचं कृषीमंत्रीपदही त्यांनी असंच भाड्याने दिलं होतं. त्यामुळे परळी आणि संपूर्ण बीड जिल्ह्यावर हे दिवस आले आहेत असा घणाघाती आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. त्याचबरोबर त्यांनी यांना पालकमंत्रीपद देऊन काय केलं याचाही खुलासा व्हायला पाहिजे असंही ते म्हणाले आहेत.
आता त्यांची संपत्ती जप्त करण्याबाबत सीआयडीने कोर्टाकडे परवानगी मागितली आहे. ही न्यायालयीन बाब आहे. त्यामुळे मी त्यावर फार बोलू इच्छित नाही. पण लवकरात लवकर त्यांच्या संपत्ती या जप्त झाल्या पाहिजे. संपत्ती जप्त झाल्याशिवाय अन्य गुन्हे जे हे आका करत होते ते उघडे पडणार नाही. यांच्या संपत्ती जप्त झालीच पाहिजे अन्यथा आम्हाला दुसरा मार्ग अवलंबवा लागतो की काय? असंही धस यावेळी म्हणाले आहेत.
हेही वाचा :
गुलिगत धोका दिलास! एक्स गर्लफ्रेंडने लग्नात राडा घातला, स्टेजवर नवऱ्याला दिला धक्का! Video Viral
एसटी महामंडळातील मोठा गैरव्यवहार उघड; 2 हजार कोटींचा घोटाळा!
जगाचा विनाश, मोठं युद्ध आणि…; बाबा वेंगा यांनी २०२५ बाबत काय भविष्यवाणी!