‘या’ दिवशी धनंजय मुंडेंचा राजीनामा, करुणा शर्मांचा खळबळजनक दावा!

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणी वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांची नावे समोर आली. वाल्मिक हा धनंजय मुंडेंच्या जवळचा असल्याने धनंजय मुंडेंच्या(political updates) राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली. वाल्मिक कराड मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. या पार्श्वभूमीवर करुणा शर्मा यांनी खळबळजनक दावा केलाय.

संतोष देशमुख हत्याप्रकरणात धंनजय मुंडेंनी राजीनामा(political updates) द्यायला हवा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे. दरम्यान भाजप आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीया यांनीदेखील वाल्मिक आणि धनंजय मुंडेंच्या जवळीकतेचे पुरावे देत राजीनाम्याचा विषय लावून धरला. करुणा मुंडे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची तारीख जाहीर केली आहे.

करुणा शर्मा यांनी 3 मार्च 2025 ही तारीख सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिली आहे. या दिवशी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. मी उपोषणाला बसणार होती पण त्यांचा राजीनामा 2 दिवस आधी अजित पवारांनी लिहून घेतलाय. 3 मार्चला यासंदर्भात घोषणा होईल, असे करुणा शर्मा म्हणाल्या. वाल्मिक कराड दोषी आढळल्यास मी स्वत:हून राजीनामा देईन, असे धनंजय मुंडे म्हणाले होते, असेही त्या म्हणाल्या.

डोळ्याचे ऑपरेशन हे खरोखर झाले आहे. पण बेल्स पाल्सी आणि इतर कारणे ही खोटी आहेत. रुग्णालयात जाण्याचे ते नाटक करतात, असा आरोप करुणा शर्मांनी केला. धनंजय मुंडेंना नेता नाही तर अभिनेता व्हायला हवं होतं, असेही त्या म्हणाल्या. धनंजय मुंडेंचे नाव घेणारी मी पहिली आहे. पण खूनात ते नाहीत.

मुंडेंच्या नावाचा वापर करुन वाल्मीक कराड घाणेरडे कृत्य करत होता, असे त्या म्हणाल्या. संतोष देशमुख प्रकरणात बोलल्यामुळे मला धमकी मिळत असल्याचेही त्या म्हणाल्या. 1200 लोकांना रिव्हॉल्वर देण्यात आल्याचे कोणाच्या सांगण्यावर? वाल्मिक सांगणार ते धनंजय मुंडे करणार, असेही त्या म्हणाल्या.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून वारवांर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येतेय. दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतलीय. त्यानंतर आताविद्रोही साहित्य संमेलनात देखील मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव घेण्यात आलाय. त्यामुळं धनंजय मुंडेंच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसताहेत.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी(political updates) आणि सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरणातील दोषी पोलीस यांना त्वरित शिक्षा करण्यात यावी. संतोष देशमुख चौकशी निःपक्षपाती होण्यासाठी नैतिकतेचा भाग म्हणून संबंधित मंत्र्यांनी मंत्रिपदापासून दूर राहावे असा ठराव करण्यात आलाय.

बीड जिल्ह्यातली वाढती राजकीय गुन्हेगारी, भ्रष्टाचाराचे आरोप आणि संतोष देशमुख प्रकरणात समर्थकांचा सहभाग या मुद्यांवर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी झाली. मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सरकारमध्येच टोलवाटोलवी सुरु झाली होती.

सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय अजितदादा घेतील असं सांगितलं. मग अजितदादांनी राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा असं सांगितलं. स्वतः धनंजय मुंडेंनी अजितदादा जेव्हा सांगतील तेव्हा राजीनामा देण्यास तयार असल्याचं सांगितलं. पण धनंजय मुंडेंनी ना राजीनामा दिला, ना मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला. आता अजित पवारांनी नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करुन धनंजय मुंडेंना अप्रत्यक्षरित्या राजीनामा द्यायला सांगितलं आहे.

हेही वाचा :

कॅन्सरमुळे प्रसिद्ध गायकाचे निधन…

शरद पवारांचा शिलेदार अजितदादांच्या गाडीत, एकत्रित प्रवास अन् राजकीय वर्तुळात चर्चा

मुलाच्या बर्थ डे पार्टीतून गोविंदा गायब; यशवर्धनने आई आणि बहिणीसोबत कापला केक, VIDEO व्हायरल