युजवेंद्र चहलला “गर्ल”फ्रेंडसोबत पाहून धनश्रीची क्रिप्टिक पोस्ट

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये फायनलचा सामना ९ मार्च रोजी झाला. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये युजवेंद्र चहलला(sports news) संघामध्ये स्थान मिळाले नाही. पण तो त्या सामान्यांपासून सोशल मीडियावर त्याचबरोबर देशभरामध्ये चर्चेचा विषय आहे. खरंतर, रविवारी दुबईमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळवण्यात आला. सामन्यादरम्यान युजवेंद्र चहल आरजे महविशसोबत दिसला. जेव्हा दोघांचे फोटो व्हायरल झाले तेव्हा इंटरनेटवर एकच खळबळ उडाली. तर दुसरीकडे युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोट झाल्याचे अनेक बातम्या समोर आल्या होत्या तेव्हापासून दोघांचे आयुष्य सध्या चर्चेत आहे.

डान्सर आणि नृत्यदिग्दर्शिका धनश्री वर्मा(sports news) यांनी एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. खरंतर, क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा पाच वर्षांच्या लग्नानंतर वेगळे झाले आहेत. अलिकडेच दोघांचा घटस्फोट झाल्याचे वृत्त समोर आले होते. अशा परिस्थितीत युजवेंद्र चहलच्या चाहत्यांनी धनश्री वर्माला ट्रोल करायला सुरुवात केली. त्यानंतर सोशल मीडियावर तिला अनेक नेटकऱ्यांनी टीका केली होती. धनश्री तेव्हा काहीच बोलली नाही, पण युजवेंद्र चहलचा एका मुलीसोबतचा फोटो व्हायरल होताच, धनश्रीने एक क्रिप्टिक पोस्ट शेअर करून तिच्या भावना व्यक्त केल्या.

युझवेन्द्र चहल भारत विरुद्ध न्यूझीलंड फायनलचा सामना पाहण्यासाठी दुबईला आला होता. तेव्हा अचानक त्याच्यावर कॅमेरा वळवण्यात आला आणि त्याच्यासोबत आरजे महाविश बसली होती. आता सध्या सोशल मीडियावर लोक आरजे महाविशला युजवेंद्र चहलची कथित प्रेयसी म्हणून संबोधू लागले. महविश किंवा चहल यावर प्रतिक्रिया देण्यापूर्वीच, धनश्री वर्माने इंस्टाग्राम स्टोरीवर एक क्रिप्टिक संदेश शेअर केला.

धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर इंग्रजीत लिहिलेले एक कोटेशन शेअर केले. या वाक्यात असे लिहिले आहे, ‘महिलांना दोष देणे ही नेहमीच एक फॅशन राहिली आहे.’ लोक म्हणत आहेत की या कोटद्वारे धनश्री एका सूक्ष्म पद्धतीने हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की लोक या घटस्फोटासाठी फक्त तिलाच दोष देत आहेत परंतु ती पूर्णपणे तिची चूक नाही. एकाने लिहिले, ‘हे सर्व चार शब्दांत सांगितले.’ दुसऱ्याने लिहिले, “त्याने नावही घेतले नाही आणि तरीही माझी बदनामी केली.”

युझवेन्द्र चहल आणि धनश्री वर्मा या दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे. त्याचबरोबर दोघांनीही त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावरून काढून टाकले आहेत त्यामुळे बऱ्याच काळापासून वृत्तांच्या माहितीनुसार या दोघांचा घटस्फोट झाला आहे असे वृत्त समोर आले आहेत. पण अजुनपर्यत या दोघांनी घटस्फोटाची माहिती अधिकृतपणे शेअर केली नाही.

हेही वाचा :

सुनीता विल्यम्सबाबत मोठी बातमी, ९ महिन्यांनंतर पृथ्वीवर परतणार

IPL 2025 सुरू होण्याआधीच बहुचर्चित खेळाडूची माघार; दोन वर्षांच्या बंदीची कारवाई होणार?

‘लाडक्या कंत्राटदारांनी अर्थसंकल्प गिळला’; अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर ठाकरेंची कडाडून टीका