मुख्यमंत्री पदासाठी मुरलीधर मोहळांची चर्चा…

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन तब्बल आठ दिवस उलटले(post) असले तरी देखील अद्याप मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा रंगात आहे. मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची नाव आग्रही आहेत. परंतु, आता मुख्यमंत्री पदासाठी पुण्याचे खासदार मुरलीधर मोहळ यांच्या नावाची चर्चा रंगली आहे.

मात्र यासंदर्भात मुरलीधर मोहळ यांनी सोशल मीडिया एक्सवर ट्विट करत या सर्व बातम्या फेटाळल्या आहेत. यावेळी मोहोळ यांनी समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित असल्याचे त्यांनी ट्विटद्वारे नमूद केलं आहे.तसेच आम्ही भारतीय जनता (post)पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणुक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढलो आहोत. तसेच यावेळी महाराष्ट्राच्या जनतेने कौल देखील ऐतिहासिक दिला असल्याचं मोहळ म्हणाले आहेत.

मुरलीधर मोहळ हे पुण्याचे खासदार असून लोकसभा निवडणुकीत त्यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यात सभा घेतली होती. यावेळी मुरलीधर मोहळ यांनी ही निवडणूक जिंकत पुण्याचे खासदार म्हणून लोकसभेत पोहोचले आहेत. एवढंच नव्हे तर मोहळ यांना केंद्रात मंत्रीपद देखील मिळालं आहे.यावेळी (post)भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाची धुरा सोपवली आहे. तसेच ते केंद्रात कार्यरत असतानाच आता अचानक राज्यातील मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या नावाची प्रचंड चर्चा होऊ लागल्याने अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या आहेत.

हेही वाचा :

महिन्याच्या शेवटी ग्राहकांना दिलासा, सोनं ‘इतक्या’ हजारांनी झालं स्वस्त?

आता महागाईमुळे आंघोळही महाग होणार, ‘या’ साबणांच्या किमती वाढणार

“आंबेडकरी समाज दुःखात बुडालेला असताना…”; शपथविधीबाबत ‘या’ नेत्याची मोठी मागणी