‘मद्यधुंद’ जवानाचं किळसवाणं कृत्य, धावत्या ट्रेनमध्ये महिलेच्या अंगावरच केली लघुशंका

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमध्ये धावत्या गोंडवाना एक्स्प्रेसमध्ये(woman) जवानाने किळसवाण कृत्य केलं आहे. मथुरातून रायपूरला जाणाऱ्या सुरक्षा दलाच्या मद्यधुंद जवानाने टॉयलेट समजून महिलेच्या अंगावरच लघुशंका केल्याचा प्रकार समोर आला आहे. या किळसवाण्या कृत्यानंतर महिलेने धावत्या ट्रेनमध्ये एकच संताप व्यक्त केला. या कृत्यानंतर जीआरपी पोलिसांनी जवानाचा फोटो काढून घेऊन गेले. मात्र, कोणत्याही प्रकारची कारवाई केल्याची माहिती समोर आलेली नाही.

हजरत निजामुद्दीनहून दुर्ग जाणाऱ्या गोंडवाना(woman) एक्स्प्रेसमध्ये मंगळवारी रात्री मोठा गोंधळ उडाला. या ट्रेनमधील बी-९ कोचमध्ये जवानाने किळसवाणं कृत्य केलं. या डब्यात सुरक्षा दलाच्या जवानाने लोअर बर्थवर झोपलेल्या महिलेवर लघूशंका केली. छत्तीसगडमध्ये राहणारी ही महिला तिच्या सात वर्षांच्या मुलासोबत प्रवास करत होती.

ट्रेन ग्वालियरला पोहोचल्यानंतर या महिलेने एकच गोंधळ घातला. महिलेने म्हटलं की, अप्पर बर्थवरील जवानाने महिलेच्या अंगावर लघुशंका केली. गोंधळ घातल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले. महिलेने तातडीने ही बाब पतीला कळवली. त्यानंतर पतीने रेल्वेकडे तक्रार केली.

चौकशीत जवानाने सांगितलं की, प्रवास करताना प्रेशर आल्याने महिलेच्या अंगावर चुकून लघूशंका केली’. तर सुरक्षा दलाचा जवान हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रेन ग्वालियरला थांबल्यानंतर जीआरपी आणि आरपीएफ पथक घटनास्थळी पोहोचलं. यावेळी त्यांना जवान हा अप्पर बर्थवर दारुच्या नशेत झोपलेला होता. यानंतर पोलिसांनी तातडीने या जवानाचे फोटो काढले. मात्र, जवानावर कारवाई केल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा :

कंगना रनौत यांच्या घरात वाजणार सनई चौघडे, साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत म्हणाली…

विधानसभेपूर्वी सांगलीत फटाके फुटणार, जयंत पाटील अन् विश्वजीत कदम आमने-सामने?

नेत्याला पक्षात घेऊन संपवायचं ही भाजपची परंपरा, अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश त्याचाच भाग…