पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव राजा येथे चिकन सेंटर (showing)चालवणारा रेहान खान याने पेठपुरा भागात राहणाऱ्या एका नऊ वर्षांच्या मुलीला, जी किराणा दुकानात अंडे घेण्यासाठी आली होती, ५० रुपयांची नोट दाखवून आपल्या दुकानात बोलावले आणि तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. पीडितेने घरी परतल्यावर घडलेला प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.

आरोपी आणि पीडित मुलगी एकाच समाजाचे असल्याने, ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. संतप्त नागरिकांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठून आरोपीला त्वरित अटक करण्याची मागणी केली. पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनवर सातशे ते आठशे लोकांचा जमाव जमा झाला होता. (showing)पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. अखेर पोलीस उपयुक्तांनी दखल घेत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि पीडितेला उपचारासाठी सामान्य रुग्णालय खामगाव येथे पाठवले. नागरिकांचा वाढता रोष पाहता पोलिसांनी दोन विशेष पथके तयार करून आरोपीला नांदुरा तालुक्यातील वसाडी येथून अटक केली.
दुसरीकडे, पुण्यातील खेड तालुक्यातील मेदनकरवाडी परिसरातही एका २७ वर्षीय महिलेवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. रात्रीच्या ड्यूटीसाठी कामावर निघालेल्या महिलेला एका अज्ञात व्यक्तीने अंधाराचा फायदा घेऊन रस्त्यावरून ओढत निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.(showing)आरोपीने महिलेला या घटनेबद्दल वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी तत्परता दाखवत काही तासांतच आरोपी प्रकाश तुकाराम भांगरे रा. मेदनकरवाडी, मूळ रा. अकोले, जि. अहमदनगर याला अटक केली आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजता चाकण येथील मेदनकरवाडी येथे घडली.
हेही वाचा :
कामाच्या वेळेत गर्लफ्रेंडसोबत सेक्स करताना मृत्यू; न्यायालयाने दिला मोठा निर्णय
‘त्या’ प्रकरणात कुख्यात गुंड अरुण गवळी निर्दोष, न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
रॉटविलर कुत्रा कोणाचाच नसतो, चार महिन्याच्या मुलीसोबत जे केलं, ते ऐकून थरकाप उडेल