रॉटविलर कुत्रा कोणाचाच नसतो, चार महिन्याच्या मुलीसोबत जे केलं, ते ऐकून थरकाप उडेल

एका पाळीव रॉटविलर कुत्र्याने चार महिन्याच्या मुलीवर हल्ला केला.(dog) हा कुत्रा इतका आक्रमक झाला की, त्याने चार महिन्याच्या मुलीला ओरबाडून-ओरबाडून मारलं. रॉटविलर कुत्र्याच्या हल्ल्यात या मुलीसोबत असलेली मावशी देखील जखमी झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या घटनेने मृत मुलीच्या कुटुंबात सगळेच हादरुन गेलेत. गुजरातच्या अहमदाबाद भागातील हाथीजन भागात ही भयानक घटना घडली.

पोलिसांनी कुत्र्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अहमदाबाद नगर पालिकेच्या सीएनसीडी विभागाच्या टीमने या डेंजर कुत्र्याला पिंजऱ्यात बंद केला आहे. हाथीजन भागातील राधे रेसीडन्सीमधील एका पाळीव कुत्र्याने चार महिन्याच्या मुलीवर हल्ला केला. एक युवती पाळलेल्या रॉटविलर कुत्र्याला घेऊन बाहेर आली होती. युवती कोणाबरोबर तरी फोनवर बोलण्यात व्यस्त होती. तेवढ्याता हा कुत्रा निसटला.(dog) त्याने समोर खेळत असलेल्या मुलांवर हल्ला केला.

कुत्र्याच्या हल्ल्याने मुलांचा एकच आरडा-ओरडा सुरु झाला. त्याचवेळी या रॉटविलरने एका लहान मुलीवर झेप घेतली. तिला वाचवण्यासाठी मावशी धावली. पण कुत्र्याने तिच्यावर सुद्धा हल्ला केला. रॉटविलरच्या हल्ल्यात मुलगी गंभीररित्या जखमी झाली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेने लोक दहशतीखाली आहेत. अहमदाबाद नगर पालिकेच्या सीएनसीडी विभागाच्या टीमने या डेंजर कुत्र्याला पिंजऱ्यात बंद केलं आहे.(dog) कुत्र्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

रॉटविलर, पिटबुल, पोमेरेनियन, जर्मन शेफर्ड आणि डॉबरमॅन हे आक्रामक ब्रीडचे कुत्रे आहेत. हे कुत्रे पाळताना खूप काळजी घ्यावी लागते. या आक्रमक कुत्र्यांना उच्च प्रशिक्षण गरजेच आहे. त्याशिवाय ते जास्त आक्रमक असतील तर त्यांना डॉक्टरकडे नेलं पाहिजे असं जनावरां

हेही वाचा :

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची सुवर्णसंधी; ‘या’ पदांसाठी मेगाभरती 

एसटी महामंडळात काम करण्याची इच्छा असणारांसाठी मोठी आनंदाची बातमी!

पक्ष तोडण्याची लायकी पाकिस्तान तोडण्याची नाही संजय राऊतांचं मोदींवर टीकास्त्र