होळीनिमित्त राज्यभरातील रेशन दुकानांवर अन्नधान्सासोबत फ्री साडी वाटप सुरु

होळी सणानिमित्त अंत्योदय रेशन कार्ड असणाऱ्या राज्यभरातील लाभार्थ्यांना वर्षातून एकदा साडी(sarees) दिली जाते. या साड्यांच्या वाटपाला सुरुवात झाली असून 26 जानेवारीपासून होळीपर्यंत रेशनच्या दुकानांवरती या साड्यांचे वाटप सुरू राहणार आहे. होळी सणानिमित्त निश्चित केलेल्या साड्यांचं वाटप केलं जाणार असून रेशन दुकानांवर आता अन्नधान्यांसोबतच साडीही मिळणार असल्याने अंत्योदय शिधापत्रिकाधारक लाडक्या बहिणींना होळी आनंदाची आणि उत्साहाची जाणार आहे.

राज्य सरकारने अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य पुरवठा विभागाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व रेशन दुकानांवर अंत्योदय कार्डधारकांच्या संख्येनुसार साड्या उपलब्ध करून दिल्या जातात. गेल्यावर्षीही ही योजना राबवण्यात आली होती. यावर्षीही होळीसणानिमित्त साडीवाटप राज्यभरातील रेशन दुकानांवर सुरु आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील महिलांना स्वस्त धान्य दुकानांमधून एक साडी(sarees) मोफत दिली जाणार आहे.

लाभार्थी महिलांनी रेशन दुकानात जाऊन ई-पॉस मशीनवर अंगठा ठेवल्यानंतर त्यांना एका कार्डवर एक साडी दिली जाते.ही योजना गरीब कुटुंबांसाठी मोठा दिलासा देणारी ठरते. अन्नधान्या सोबत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी रेशन दुकानांवर मोफत दिली जाते. सरकारने निश्चित केलेल्या सणाच्या दिवशी या साड्यांचे वाटप केलं जातं. 26 जानेवारीपासून या साड्यांच्या वाटपाला सुरुवात झाली आहे होळीपर्यंत हे वाटप सुरू राहणार आहे.

सर्वाधिक साड्या पुण्याच्या बारामतीत
पुणे जिल्ह्यातील 48 हजार 874 महिलांना साडी देण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्वात जास्त साड्या या 7 हजार 975 साड्या बारामती तालुक्यामध्ये दिल्या जाणार आहेत.

आंबेगाव – 5137 बारामती – 7975 भोर – 1909 दौंड – 7222 हवेली – 251 इंदापूर – 4453 जुन्नर – 6838 खेड – 3218 मावळ – 1536,मुळशी – 540 ,पुरंदर – 5285,शिरूर – 3990

हेही वाचा :

लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणत्याही क्षणी फेब्रुवारीचा हप्ता येणार

खळबळजनक! अभिनेत्री बनवण्याचं आमिष दाखवलं, सिंगापुरात नेऊन अत्याचार, नको ते व्हिडिओ काढले अन्…

या राशीच्या लोकांना त्यांच्या बॉसचा पाठिंबा मिळेल, व्यवसायातही फायदा