नरक चतुर्दशीला करा ‘हे’ काम, जीवनात सुख-समृद्धीसह येईल भरभराट!

देशभरात सध्या दिवाळी(diwali) या सणाची धामधूम सुरू आहे. हिंदू धर्मात दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो. 5 दिवस घरोघरी दिवाळी साजरी केली जाते. उद्या 31 ऑक्टोबररोजी नरक चतुर्दशीचा दिवस असेल. या दिवशी देवी लक्ष्मी, यमराज, भगवान श्रीकृष्ण, काली माता, भगवान शंकर, भगवान हनुमान आणि भगवान विष्णू यांच्या वामन स्वरुपाची पूजा केली जाते.

प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्ष तिथीला नरक चतुर्दशी साजरी करतात. यालाच छोटी दिवाळी (diwali)असंही म्हणतात. या दिवशी घरात सुख-शांतीसाठी काय करावे आणि काय करू नये, याबाबत या लेखात सविस्तर सांगितले आहे. ते आपण जाणून घेऊयात.

नरक चतुर्दशीला काय करावे?
सर्वप्रथम पहाटे लवकर उठावे.
या दिवशी पहाटे लवकर उठून उटण्याने स्नान करणं शुभ मानलं जातं
14 दिव्यांची आरास लावावी
या शुभ दिनी भगवान विष्णूसह, कृष्ण आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी
या दिवशी देवी-देवतांच्या मूर्ती घराच्या ईशान्य कोपर्‍यात स्थापित कराव्या आणि त्यांची पूजा करावी.

नरक चतुर्दशीला काय करू नये?
या दिवशी मांसाहारी पदार्थ तसेच तामसिक पदार्थांचं भोजन करू नये
या दिवशी केस आणि नखं कापू नये
या दिवशी फार उशिरापर्यंत झोपू नये
या शुभ दिनी कोणत्याही मुक्या प्राण्याची हत्या करु नये
नरक चतुर्दशीच्या दिवशी मीठ, तेल आणि खोट्या वस्तूंचं दान करणं अशुभ मानले जाते.

हेही वाचा :

लाडकी बहीण योजना बंद…’या’ नेत्यानी केला मोठा दावा?

नोव्हेंबरमध्ये तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका बंद राहणार!

शिवसेनेच्या माजी आमदाराची जीभ घसरली; शिवसेना एक सुंदर स्त्री… मात्र लोक आता…Video