सोनियाजींच्या घरी मोलकरीण नव्हती म्हणून तुम्ही भांडे घासायला गेलता का?, शिंदे गटाची ठाकरेंवर टीका
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे नुकतेच तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर(dishes) गेले होते. या दौऱ्यात त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या बड्या नेत्यांशी चर्चा केली.
दरम्यान, त्यांच्या या दिल्ली दौऱ्यावरून आता शिवसेना आमदार(dishes) शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. सोनिया गांधींच्या घरी मोलकरीण नव्हती म्हणून तुम्ही दिल्लाला भांडे घासायला गेलता का? असा खोचक सवाल शहाजीबापू पाटील यांनी केला.
शहाजीबापू पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. काल मनसे कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या गाडीवर दगड फेकले याविषयी बोलताना ते म्हणाले, तुम्ही दुसऱ्यांच्या गाड्यांवर सुपारी फेकायला लागल्यावर तुमच्या गाडीवर नारळ पडणारच आहे. तुम्ही सुपाऱ्या फेकल्यावर त्यांनी काय बघत बसायचं का? मुळात असल्या राजकारणाची सुरूवात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनच केली, असं शहाजीबापू पाटील म्हणाले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे असल्या राजकारणात ज्येष्ठ नेते शरद पवार हे देखील मिसळायला लागले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
पुढं ते म्हणाले, मी लहानपणापासून पाहित आलेलं राजकारण सध्या राहिलं नाही. या विरोधकांनी अतिशय वाईट राजकारण केलं आहे. शब्दाला कोठे धार नाही, नको ती भाषा, भविष्यात फक्त आई-बहिणीवरून शिव्या देणं बाकी राहिलं आहे. निवडणुकीच्या काळात जयंत पाटील, शरद पवार, उद्धव ठाकरे आम्हाला आयाबहिणींवरून शिव्या देतील, असंही पाटील म्हणाले.
यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊतांवरही टीका केली. ते म्हणाले, संजय राऊत यांना बोलण्याची आणि लिहिण्याची कला सापडली असल्याने त्यांनी महाराष्ट्र बिघडवण्याचं काम करू नये. राऊत सकाळी टीव्हीवर आले की लोक टीव्ही बंद करतात, अशी खोचक टीका टीका शाहजीबापू पाटील यांनी केली.
लोकसभेतील काही मुद्दे चुकून त्यांच्या हाताला लागली आहेत. त्यामुळं त्यांना यश मिळाले. आताही असंच घडेल असं वाटत नाही. मात्र लोकसभा आणि विधानसभेत खूप फरक आहे. लोकसभेला मुसमानांची मते आम्हाला मिळाली नाहीत. मात्र आता विधानसभेत मुस्लिम समाज आमच्यासोबत असेल, असा दावा शहाजीबापू पाटील यांनी केला.
हेही वाचा:
मराठा आंदोलकांचा शरद पवारांना थेट प्रश्न? फक्त पाठिंबा नको भूमिका सांगा?
नागा चैतन्यचा साखरपुडा होताच समांथाला आलं लग्नाचं प्रपोजल
आमचे मुख्यमंत्री पहाटे 4 वाजेपर्यंत काम करतात, मी पहाटे 5 वाजता उठून कामाला लागतो : अजित पवार