डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत अन् चीनला दणका

न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांनी शुक्रवारी मोठी घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीन या सारख्या देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याची घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या वस्तूंच्या आयातीवर जितका टॅरिफ एखादा देशल लावेल. त्यांच्या देशातून आयात केल्य जाणाऱ्या आयातीवर तितका टॅरिफ लावू, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.

डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) म्हणाले की, आम्ही लवकरच रेसिप्रोकल टॅरिफ लावणार आहोत. जितकं आयात शुल्क ते लादतीलत तितकं आम्ही त्यांच्याकडून शुल्क लादणार आहोत. मग कंपनी भारताची असो किंवा चीनमधील, कोणताही देश असो, आम्हाला वाटतं आम्ही निष्पक्ष राहायला हवं. यासाठी रेसिप्रोकल टॅरिफ लादणार आहोत. आम्ही करोना सुरु होण्यापूर्वीपासून याची तयारी करत होतो, असंही ट्रम्प म्हणाले.
गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय बैठकीपूर्वी ट्रम्प यांनी भारताच्या टॅरिफ रचनेवर भाष्य केलं होतं. भारत हा सर्वाधिक टॅरिफ लादणारा देश आहे, असं ट्रम्प म्हणाले आहेत. सर्वाधिक टॅरिफ असल्यानं भारतासोबत व्यवसाय करणं अवघड होतं. ट्रम्प यांनी भारत आणि चीनवर रेसिप्रोकल टॅरिफ लादण्याचा उल्लेख एका पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी केला होता. ज्यामध्ये टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांच्या नरेंद्र मोदींच्या भेटीबाबत विचारण्यात आलं होतं.
डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी आणि एलन मस्क यांची भेट झाली आहे. मला वाटलं की मस्क यांना भारतात व्यवसाय करायचा आहे. मात्र, टॅरिफ मुळं भारतात व्यवसाय करणं अवघड आहे. भारत सर्वाधिक टॅरिफ असणारा देश आहे, त्यामुळं व्यापार करणं मुश्किल आहे. मला वाटतं ते यासाठी भेटले की ते एक कंपनी चालवत आहेत.ते म्हणाले एलन मस्क एक कंपनी चालवत आहेत, यामुळं मोदींना भेटले असतील. मस्क दीर्घकाळापासून ज्याचा विचार करत आहेत त्यामुळं त्या गोष्टी करत आहेत.

कोणत्याही देशातून आयात केल्या जाणाऱ्या उत्पादनांवर जो कर आकारला जातो त्याला टॅरिफ म्हणतात. या टॅरिफची रक्कम आयात करणाऱ्या कंपनीकडून सरकारला दिली जाते. रेसिप्रोकल टॅरिफचा अर्थ कोणताही देश आपल्याकडे आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर 10 टक्क्यांहून अधिक कर लादला जातो. दुसरे देशही त्या देशातून उत्पादित केलेल्या उत्पादनांवर टॅरिफ लादला जातो.
हेही वाचा :
“ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं”, शिंदे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट
माझी बहिण रात्री ११ वाजेपर्यंत घरी आली नाही तर… : भूमी पेडणेकर
सरकारने सेट केली डेडलाइन, 1 एप्रिलपासून विना रजिस्ट्रेशन विकले जाणार नाहीत SIM Card