संकष्टी चतुर्थीला करा या गोष्टींचे दान, तुमची होईल प्रगती
दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचा(Sankashti Chaturthi) उपवास केला जातो. यंदा हे व्रत शुक्रवार, 17 जानेवारीला पाळण्यात येणार आहे. हे व्रत भगवान श्री गणेश आणि माता सकट यांना समर्पित आहे. या दिवशी गणेशाची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते, असे मानले जाते.
शास्त्रानुसार सकट चौथचे व्रत पाळल्याने मुलांना दीर्घायुष्य, सुख-समृद्धी प्राप्त होते. श्री गणेश आणि माता सकट यांची विधिवत पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि धन-समृद्धी येते, अशी पौराणिक मान्यता आहे. मान्यतेनुसार या दिवशी काही वस्तूंचे दान करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीला कोणत्या गोष्टींचे दान करणे फायदेशीर ठरेल.
माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी शुक्रवार, 17 जानेवारीला पहाटे 4.6 पासून सुरू होईल आणि शनिवार 18 जानेवारीला पहाटे 5.30 वाजेपर्यंत राहील. शुक्रवारी 17 जानेवारी रोजी संकष्टी चतुर्थीचे(Sankashti Chaturthi) व्रत पाळण्यात येणार आहे. यावेळी चंद्रोद्य रात्री 9.9 वाजता असेल.
या वस्तूंचे करा दान
काळ्या तिळाचे दान
संकष्टी चतुर्थीला काळे तीळ दान करणे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार काळ्या तिळात अनेक देवता वास करतात. त्याचे दान केल्याने पुण्य तर मिळतेच, शिवाय शरीर निरोगी राहून बालकाला दीर्घायुष्य लाभते.
गुळाचे दान
या दिवशी गुळाचे दान केल्यास श्रीगणेश प्रसन्न होतात, असे मानले जाते. हे दान जीवनातील संकटे दूर करते आणि नशीब मजबूत करते. त्यामुळे सकट चौथच्या दिवशी गुळाचे दान केले जाते.
तुपाचे दान
संकष्टी चतुर्थीला तूप दान करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी तूप दान केल्याने आरोग्य आणि धनाशी संबंधित समस्या दूर होतात. तूप दान केल्याने शुभ फल प्राप्त होते असे मानले जाते.
मिठाचे दान
या दिवशी मीठ दान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. मिठाचे दान केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते आणि वाईट नजरेपासून मुक्ती मिळते, असा पारंपरिक समज आहे.
कपड्यांचे दान
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उबदार कपडे दान करणे खूप शुभ मानले जाते. हा उपवास साधारणपणे जानेवारी महिन्यात होतो, जेव्हा हिवाळा असतो. या दिवशी गरजूंना उबदार कपडे किंवा ब्लँकेट दान केल्याने पुण्य प्राप्त होते. हे दान जीवनात आर्थिक प्रगती आणि आशीर्वाद देणारे मानले जाते.
( टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे.)
हेही वाचा :
आयुष्याला कंटाळला कामगार, इमारतीच्या 13 मजल्यावरून मारली उडी Video Viral
पनीरपेक्षाही स्वस्त चॅम्पियन्स ट्रॉफीचं तिकीट; किंमत ऐकून व्हाल थक्क!
हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले