“जास्त हुशार्या मारू नका, मी पुन्हा येईन”; शिंदेंच्या ‘या’ आमदाराचं सूचक वक्तव्य
महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार गेल्या रविवारी पार पडला. यावेळी महायुतीमधील(political news todays) तिन्ही पक्षाकडून अनेक बड्या चेहऱ्यांचा पत्ता कट करण्यात आला असून नव्या चेहऱ्यांना यावेळी संधी देण्यात आली. शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांची देखील कॅबिनेटमध्ये वर्णी लागली नाही. यावरून वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. याला आता स्वतः अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर देत विरोधकांना थेट इशाराच दिलाय.
सिल्लोडचे आमदार(political news todays) अब्दुल सत्तारांनी विरोधकांवर हल्लाबोल करत मी पुन्हा येईन, असा विश्वास व्यक्त केलाय. मी चौथ्यांदा विधानसभेत निवडून गेल्यानंतर सिल्लोडला मंत्रीपद मिळेल अशी सगळ्यांनाच अपेक्षा होती. मात्र ते मिळालं नाही.राज्यात सर्वच भागाचा समतोल साधावा लागतो. त्यामुळे मी नाराज नाही आणि कार्यकर्त्यांनी नाराज राहू नये. त्यामुळे जास्त हुशार्या मारू नका, मी अडीच वर्षानंतर मंत्री म्हणून मी पुन्हा येईल, असं अब्दुल सत्तार म्हणाले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी अब्दुल सत्तार यांच्यासह दीपक केसरकर, तानाजी सावंत यांचा देखील मंत्रीमंडळातून पत्ता कट केलाय. सध्या केसरकर व सावंत यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. तर, अब्दुल सत्तार नुकतेच व्यक्त झाले. त्यांनी मन मोकळं बोलत विरोधकांनाही खडेबोल सुनावले.अब्दुल सत्तार एका सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी ‘मी पुन्हा येईन’ असं म्हटलंय.
दरम्यान, महायुतीने यंदा मंत्रीपद देताना वेगळे निकष ठेवल्याची चर्चा आहे. भाजपाप्रमाणेच राष्ट्रवादी व शिवसेना पक्षाने सुद्धा मंत्र्यांच्या कामकाजाचे मूल्यांकन केले. तसेच त्यांनी काही वादग्रस्त विधानं केली आहेत का?, याबाबतही विचार करण्यात आला. त्यामुळे काही जुन्या मंत्र्यांना यंदा मंत्रीमंडळात डच्चू देण्यात आलाय.
दरम्यान, शिवसेनासह भाजपा आणि राष्ट्रवादीकडूनही काही जुन्या मंत्र्यांचा पत्ता कट करण्यात आलाय. यामुळे इच्छुक आमदार नाराज झाले आहेत. राष्ट्रवादीमध्ये ओबीसी नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आलेय.यामुळे भुजबळ चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी उघडपणे याबाबत नाराजी व्यक्त केली. याचबरोबर विजय शिवतारे यांनी देखील मंत्रीपद न दिल्याची खदखद बोलून दाखवली आहे.
हेही वाचा :
मारहाण व मराठी भाषेला हिणवणाऱ्या शुक्लाला अटक करा अन्यथा…; मनसे आक्रमक
यंदा MPSC च्या वर्षभर परीक्षाच-परीक्षा; वेळापत्रकही जाहीर, सरकारी नोकरीचा प्रयत्न करणाऱ्यांना ‘अच्छे दिन’
पाणी प्रदूषणामुळे मिरजेतील गणेश तलावात ६०० किलो मासे मृत