भेदभाव करू नका, लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्या; उद्धव ठाकरेंनी सुनावलं
शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर(yojana) घणाघाती टीका केली. याच पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. लाडक्या बहिणींना २१०० रुपये तत्काळ द्यावेत अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर जे नाराजीनाट्य सुरू झालं आहे त्यावरही उद्धव ठाकरेंनी खोचक टीका केली. सध्या विजयाचे फटाके कमी पण नाराजीचे बार जास्तच वाजत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
लाडक्या बहिणींना न्याय देण्याऐवजी सध्या सरकारमध्ये(yojana) लाडके आणि नावडते आमदार चर्चेत आहेत. पण, सरकारने आता अटी बाजूला ठेवाव्यात आणि राज्यातील लाडक्या बहिणींना २१०० रुपये तत्काळ द्यावेत. सरकारकडून पैसे देताना कोणताही भेदभाव केला जाऊ नये असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
लोकशाहीमध्ये मी माझं मत कोणाला देतोय, हे समजलं पाहिजे. तो अधिकार आता हरवला जात आहे. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देखील अडीच वर्षांनी बदलणार का? असा सवाल देखील ठाकरेंनी केलाय. की केवळ मंत्रीपद बदलून आपल्या खुर्च्या बळकट करणार आहात आणि बाकीच्यांना खेळवणार आहात, असं देखील उद्धव ठाकरे यांनी विचारलं आहे.
एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, लोकांचा गैरसमज दुर करा असं ते म्हणाले आहेत. भुजबळ अजून संपर्कात नाहीत, परंतु अधूनमधून त्यांच्याशी संपर्क होत असतो, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
तसेच इकडे मंत्रिपदावरून जितकी खळखळ आहे, तितकी इंडिया आघाडीत नाही. नागपूर ही होर्डिंग नगरी झालीय. आपला दादा, भाऊ, कर्णधार कोण? यामध्ये सगळे एकमेकांचा वापर करून घेत आहेत. अनेक नाराज असलेले लोक संपर्कात असल्याचे निरोप येत आहेत. अनुभवाच्या गुरूने त्यांना धडे घेवू द्या, त्यानंतर ते सुधारलेत तर बघू असे संकेत देखील उद्धव ठाकरे यांनी दिलेत.
हेही वाचा :
तरच 2100 रुपये मिळणार?’; लाडक्या बहीणींनो ‘या’ 6 गोष्टी लगेच चेक करा
मनोज जरांगे नव्या वर्षात करणार धमाका?, केली मोठी घोषणा
थंडीत पाठदुखी वाढते? औषधांऐवजी ‘या’ नैसर्गिक उपायांनी करा वेगाने बरे