माझा फोटो वापरून रवी राणांनी प्रचार केला हे विसरू नका, बच्चू कडूंचे राणा दाम्पत्यांना प्रत्युत्तर

अमरावती लोकसभा मतदार संघातून भाजपकडून निवडणुकीच्या(couples therapy) रिंगणात उभ्या राहिलेल्या नवनवीत राणा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत बच्चू कडू यांच्यावर टीका केली होती. आता बच्चू कडू यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘माझा फोटो वापरून रवी राणांनी प्रचार केला हे विसरू नका.’, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.

भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या फेसबुक(couples therapy) पेजवरून एक पोस्ट मोठ्या व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये बच्चू कडू हे हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असताना त्यांना रवी राणा भेटायला गेले होते. हा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, ‘जेव्हा कोणीही नव्हतं साथीशी, तेव्हा रवी राणा होते पाठीशी. विसरलात काय बच्चू कडू?’ या पोस्टद्वारे त्यांनी बच्चू कडू यांना सवाल विचारला होता.

आता नवनीत राणा यांच्या या फेसबुक पोस्टवर बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिले आहे. साम टिव्हीशी बोलताना बच्चू कडू यांनी सांगितले की, ‘मी पण रवी राणा यांच्या भेटीला गेलो होतो. त्या पण पोस्ट मला टाकता येतात. जेव्हा आम्ही एकत्र निवडणूक लढलो. तेव्हा माझा फोटो वापरून रवी राणा प्रचार करत होते. हे त्यांनी विसरू नये.’, अशी टीका बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यांवर केली.

दरम्यान, राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. बच्चू कडू शिवसेना शिंदे गटासोबत गेल्यापासून त्यांच्यावर टीका सुरू आहे. खोके घेऊन आलेले आमदार अशी टीका रवी राणा यांनी केली आहे. नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बच्चू कडू यांनी त्यांच्यावर टीका केली होती. ‘नवनीत राणा यांना निवडणुकीत पाडणार.’, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता.

हेही वाचा :

लोकसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळतील? प्रसिद्ध अर्थतज्त्रांनी केलं भाकित

रोहित मुंबईच्या संघापासून एकटाच वेगळा राहतोय! खुलासा करत म्हणाला, ‘मुंबईचे शेवटचे..’

वंचित बहुजन आघाडीत मोठी फूट; नाराज जिल्हाध्यक्षांनी दिला काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा