सबसिडीच्या भरवशावर राहू नका, सरकार म्हणजे विषकन्या- नितीन गडकरी

राजकीय(politics) वर्तुळात नेतेमंडळींची वक्तव्य कायमच चर्चेचा विषय ठरतात. त्यातच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता फार कमी कालावशी शिल्लक राहिल्यामुळं नेतेमंडळी आणि त्यांची मतं, याबाबत बऱ्याच प्रतिक्रिया सामान्यांमधून पाहायला मिळत आहेत. सध्या याच चर्चांच्या वर्तुळात समोर आलेलं नाव म्हणजे नितीन गडकरी यांचं.

नितीन गडकरी यांनी राजकीय पक्षांबाबत केलेल्या विधानाची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. ‘सरकार कोणत्याही पक्षाचं असो त्यापासून दूर राहिलं पाहिजे. कारण, सरकार म्हणजे विषकन्या असते’ असं मोठं विधान नितीन गडकरी(politics) यांनी केलं. सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडीच्या भरवशावर राहू नका असा सल्लाही त्यांनी उद्योजकांना दिला. नागपूरमधील विदर्भ इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट काऊन्सिलच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काऊन्सिलच्या वतीने मध्य भारतातील पर्यटनावर आधारित कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, जिथं गडकरी बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. ज्यामध्ये शिवटेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची प्रतिक्रियाही लक्ष वेधून गेली.

सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी अनेक राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिल्या. यावेळी त्यांनी गडकरींच्या वक्तव्यावरही आपलं मत मांडल्याचं पाहायला मिळालं.

‘देवेंद्र फडणवीस यांनी सर्व लाडक्या बहिणींचा डेटा घेऊन त्यांना व्यक्तिगत पत्र पाछवलं आहे, जिथं मुख्यमंत्री हा शब्दच वगळण्यात आला आहे. गडकरी जे म्हणत आहेत ते बरोबर आहेत. सरकारी तिजोरीत पैसे नसताना पैशांचा गैरवापर सुरू असल्यास केंद्राची काही जबाबदारी आहे की नाही? गडकरी एक ज्येष्ठ नेते आणि मंत्री असून, त्यांनी केंद्रीय मंत्रीमंडळात या मुद्द्यावर प्रस्ताव मांडायला हवा’, असं राऊत म्हणाले. गडकरींचं वक्तव्य आणि त्यावर राऊतांची प्रतिक्रिया यानंतर आता केंद्रीय मंत्र्यांच्या विधानाचे आणखी किती पडसाद उमटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

हेही वाचा :

जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सची साथ सोडणार?

केंद्र सरकार 3 विधेयक आणून नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच मोठा निर्णय घेणार? 

मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर