“गरबा खेळायला येणाऱ्या प्रत्येकाला गोमूत्र पाजा”; भाजप नेत्याचा अजब सल्ला

नवरात्री महोत्सव आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. नवरात्रीसाठी देशभरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. हिंदू धर्मात नवरात्री हा महत्वाच्या सणापैकी एक सण आहे. या काळात नऊ दिवस देवी दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते. नऊ दिवस गरबा देखील खेळला जातो. सध्या अनेकांचा गरब्याचा सराव जोरात सुरू आहे. अशात नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत भाजप नेत्याने(political consulting firms) एक अजब सल्ला दिला आहे. याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

गरबा खेळण्यासाठी येणाऱ्या बिगर हिंदूंना रोखण्यासाठी एका भाजप जिल्हाध्यक्षानं एक विचित्र कल्पना सांगितली आहे. गरबा खेळायला येणाऱ्या प्रत्येकाला गोमूत्र प्यायला द्यावं, असा अजब सल्ला इंदूरमधील भाजपच्या जिल्हाध्यक्षाने दिला आहे.

इंदूरचे भाजप(political consulting firms) जिल्हाध्यक्ष चिंटू वर्मा यांनी हा अजब सल्ला दिला आहे. गरबा खेळण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला गोमूत्र प्यायला द्यावं. ती व्यक्ती हिंदू असेल तर त्याला गोमूत्र पिण्यास काही हरकत नसेल. गरब्याला येण्यासाठी लोक डोक्यावर टिळाही लावतात. अशा परिस्थितीत पंडालमध्ये येणाऱ्या लोकांना गोमूत्र पाजल्यानंतरच प्रवेश द्यावा, असं भाजप नेते चिंटू वर्मा म्हणाले.

गाय ही आपली माता आहे आणि आपण तिची पूजा करतो. त्यामुळे हिंदूंना गोमूत्र पिण्यास कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे गरबा खेळण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गोमूत्र प्यायला द्यावं, असं भाजप नेत्याने म्हटलं आहे. याची आता सर्वत्र चर्चा रंगली आहे.

पुढे भाजप नेते चिंटू वर्मा म्हणाले की, आपण सर्वजण गोमूत्र वापरतो, त्यामुळे प्रत्येकानं ते प्यावं. त्यात कोणाला काय अडचण आहे?, असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, नवरात्री उत्सव हा येत्या 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.नवरात्रीत अनेक ठिकाणी गरबा नाईट्सचंही आयोजन करण्यात येते.नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येनं गरबा खेळण्यासाठी लोक एकत्र येतात. याच पार्श्वभूमीवर इंदूरचे जिल्हाध्यक्ष चिंटू वर्मा यांना प्रश्न करण्यात आला असता त्यांनी हा अजब सल्ला दिला.

हेही वाचा :

PL 2025 मध्ये रोहित शर्मा RCB चा कॅप्टन?

‘गाढवाबरोबरच्या क्रूरतेने नेटकऱ्यांना चटका दिला; ‘देवही माफ करणार नाही’ अशी प्रतिक्रिया

समुद्राची पातळी वेगाने वाढत आहे; दक्षिण आशिया आणि पॅसिफिक आयलंड्ससाठी धोका वाढला