कोमट पाण्यात देशी तूप घालून प्यायल्यास मिळतात अद्वितीय फायदे..

आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येक जण आपल्या आरोग्याबद्दल जागृत झालाय. त्यासाठी योगा, (water)जीमसोबत डाएटवर भर देताना पाहिला मिळत आहे. पण अनेक जण चुकीच्या डाएट आणि अनेक पदार्थांवर बंदी यामुळे ते लोक अनेक प्रकाराच्या आजारांना बळी पडतात. महिला असो पुरुष वजन वाढू नये म्हणून तूपाचे सेवन बंद करतात. आयुर्वैदात तूप हा पदार्थ अतिशय गुणकारी मानला जातोय. तुम्हाला माहितीये का कोमट पाण्यात तूप मिसळून सेवन केल्यास आरोग्याला जबरदस्त फायदे मिळतात. तुपामध्ये अ, ड, ई आणि के सारखे पोषक घटक तसंच फॅटी अॅसिड आरोग्यासाठी गुणकारी आहे.

कोमट पाण्यात तूप मिसळून पिणे हा आयुर्वेदिक हा सर्वात उत्तम उपचार मानला जातो. हे शरीराला आतून मजबूत करण्यास मदत मिळते. तूप मिसळून पाणी प्यायल्याने पचनसंस्था निरोगी राहते. हे पोटाशी संबंधित समस्या जसे की गॅस, अपचन आणि आम्लता कमी करण्यास मदत मिळते. सकाळी लवकर ते प्यायल्याने पोट स्वच्छ राहते. यामुळे बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
चेहऱ्यावर चमक येईल
तुपामध्ये असलेले ओमेगा-3 फॅटी अॅसिड त्वचेची ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात. ते पाण्यासोबत प्यायल्याने त्वचा सुधारते. त्वचा दीर्घकाळ तरुण आणि निरोगी राहते.
मेंदूसाठी फायदेशीर
तूप खाणे मेंदूसाठी खूप फायदेशीर मानले गेलंय. मेंदूचे कार्य वाढवण्यासोबतच, मेंदूचे लक्ष केंद्रित करण्यास देखील मदत होते. यामुळे स्मरणशक्ती सुधारते. देशी तूप मेंदूला हायड्रेट ठेवते. कोमट पाण्यासोबत तूप घेतल्याने मेंदूला पुरेशा प्रमाणात फॅटी अॅसिड मिळतात.
डोळ्यांसाठी फायदेशीर
देशी तूप डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे दृष्टी सुधारते आणि तुम्ही डोळ्यांभोवती तूप देखील लावू शकता.
शरीराची ताकद वाढवते
तूपाचे पाणी शरीराची ताकद वाढवण्यास मदत करते. हे हाडे आणि स्नायूंना बळकटी देण्यास फायदेशीर ठरते. यामध्ये असलेले कॅल्शियम हाडांसाठी खूप फायदेशीर आहे.
पाण्यात मिसळून तूप कसे सेवन करावे
1 – अर्धा चमचा देशी तूप एका ग्लास कोमट पाण्यात मिसळा.
2 – ते चांगले मिसळा आणि रिकाम्या पोटी हळूहळू प्या.
3 – चांगल्या परिणामांसाठी, ते दररोज सकाळी या पाण्याचं सेवन करा.
हेही वाचा :
मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ लोकांना मिळणार नाही रेशन
गजराजाशी मस्ती मगरीला पडली महागात, सोंडेला पकडताच असे केले… Video Viral
चेन्नईत एड शीरनच्या कॉन्सर्टमध्ये ए. आर. रहमानचा जलवा, ‘उर्वशी-उर्वशी’ने रंगला माहोल!