वाहन चालकांनो सावधान! विरुद्ध दिशेने वाहन चालवल्यास टायर फुटणार

विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना(Driving) चाप बसाला यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी अनोखी शक्कल लढवत टायर किलर बलवले आहेत. वाहतूक कोंडीनंतर ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून जाणारी वाहतूक थांबवण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिस आणि ठाणे महानगरपालिकेने टायर किलर बसविले आहेत. ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाने पहिल्यांदाच प्रायोगिक तत्वावर टायर किलर बसविण्यात आले आहेत. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास शहरातील इतर मार्गिकांवरही टायर किलर बसविले जाणार असल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे.

ठाणे रेल्वे स्थानकाजवळील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी एक दिशा मार्गिका केल्या आहेत. असे असले तरी या मार्गिकांवर वाहतुक पोलीस नसल्यास काही वाहन चालक विशेषत: रिक्षा आणि दुचाकी वाहने चालवून या मार्गिकांमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन कोंडीमध्ये भर पडते.

विरुद्ध दिशेने वाहने चालविल्यास(Driving) गंभीर अपघाताच्याही घटना घडतात. त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिस आणि ठाणे महानगरपालिकेने या मार्गांवर टायर किलर बसविण्याचा निर्णय घेताल होता. त्यानुसार, रविवारी, ठाणे रेल्वे स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पथ परिसरात येथून मो.ह. शाळेकडे जाणाऱ्या मार्गावर एक टायर किलर बसविण्यात आले आहे. या टायर किलरमुळे विरुद्ध दिशेने होणाऱ्या वाहतुकीलाही आळा बसणार असल्याची माहिती वरिष्ठ पेालीस निरीक्षक रोहिणी सोनार पोलिसांनी दिली.

या टायर किलरमुळे नागरिकांच्या डोक्याच्या ताप वाढला आहे. ठाणे जिल्ह्यांमध्ये रक्तपाताची समस्या निर्माण झाली आहे. या टायर किलरने गेल्या २४ तासांत ७ जणांना गंभीर जखमी केले आहे. ही संकल्पना चांगली असली तरी वाहतूक शाखेचा रोगापेक्षा इलाज भयंकर झाला आहे. दरम्यान, जखमी पादचाऱ्यांना थेट रुग्णालय गाठावे लागत असल्याने स्टेशन परिसरात बसवण्यात आलेल्या टायर किलरची जागा बदलावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना चाप बसविण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेने ‘टायर किलर’ नवी संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. ठाणे स्टेशन परिसरातील पंजाब नॅशनल बँकेसमोर प्रायोगिक तत्त्वावर रविवारी सायंकाळी पहिला टायर किलर बसवण्यात आला. त्यानंतर नियमांना पायदळी तुडवणाऱ्यांना चांगलाच दणका बसेल असा विश्वास वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिला. मात्र आता हे टायर किलर जीवघेणे ठरू लागले असल्याचे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

…म्हणून पुरुषांना लांब केस असलेल्या स्त्रिया आवडतात

एसटी बसचालक-वाहकांची मद्यप्राशन तपासणी; अपघात टाळण्यासाठी घेतला निर्णय

खेळताना एक वॉशिंग मशीनमध्ये चढला दुसऱ्याने प्लग ऑन केला अन्…; पुढे जे घडलं भयंकर, Video Viral