आई वडीलांच्या गप्पांच्या दरम्यान,चिमुकलीचा अपघात कारने चिरडले VIDEO

 आग्राच्या कॉसमॉस मॉलच्या पार्किंगमध्ये हा अपघात झाला. (parking)शॉपिंगनंतर आई-वडील गप्पा मारत उभे राहिले होते. त्याच ठिकाणी खेळत असलेल्या दीड वर्षांच्या चिमुकलीला कारने चिरडले.उत्तर प्रदेशमधील एका शॉपिंग मॉलच्या पार्किंगमध्ये कारने चिमुकलीला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातामध्ये चिमुकलीचा मृत्यू झाला. आग्राच्या कॉसमॉस मॉलच्या पार्किंगमध्ये हा अपघात झाला. शॉपिंगनंतर आई-वडील गप्पा मारत उभे राहिले होते. त्याच ठिकाणी खेळत असलेल्या दीड वर्षांच्या चिमुकलीला कारने चिरडले. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, चिमुकलीचे पालक शॉपिंग मॉलच्या पार्किंगमध्ये ट्रॉलीमध्ये असलेले सामान तपासत असल्याचे दिसत आहे. त्यांची दीड वर्षांची मुलगी (parking)आणि मुलगा पार्किंगमध्ये खेळताना दिसत आहेत. त्याचेवळी एका कार चालकाने पार्किंगमध्ये उभी असलेली आपली कार काढली. आधी त्याने कार रिव्हर्स केली आणि पुढे नेली. पण याचवेळी दीड वर्षांची चिमुकली कारच्या समोर आली. कार चालकाला मुलगी दिसली नाही त्यामुळे कारच्या चाकाखाली चिमुकली चिरडली गेली.

मुलीच्या रडण्याचा आवज ऐकून तिच्या आईने कारच्या दिशेने धाव घेतली. नेमकं काय घडलं हेच तिला कळाले नाही. तिने तात्काळ आपल्या मुलीला कारच्या बाजूला काढले. त्यानंतर कारमधील माणसं देखील बाहेर आली. चिमुकलीच्या वडिलांनी तिला आपल्याजवळ घेऊन तात्काळ त्याच कारमध्ये बसून रुग्णालयात धाव घेतली. चिमुकली आणि तिच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये सोडल्यानंतर कार चालकाने (parking)घटनास्थळावरून पळ काढला.

ही घटना ६ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास आग्रा येथील कॉसमॉस मॉलच्या पार्किंगमध्ये घडली. द फ्री प्रेसच्या वृत्तानुसार, कारखाली चिरडल्या गेलेल्या चिमुकल्या मुलीचा मृत्यू झाला. तिचे नाव रुद्रिका होते. चिमुकलीचे वडील जयदीप आपल्या पत्नी आणि १० वर्षांच्या मुलासह कॉसमॉस मॉलमध्ये शॉपिंगसाठी गेले होते. त्याचवेळी ही धक्कादायक घटना घडली. मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे जयदीप यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

हेही वाचा :

हिमाचल प्रदेशात जोरदार पाऊस; अनेक जिल्ह्यात पूर, रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम

धोनीच्या मेहुण्यासोबत विवाहबंधनात अडकणार बॉलिवूडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री!

हार्दिकनेच दिला होता नताशाला गोलीगत धोका? पांड्याच्या एक्स वाईफला भावना अनावर