शुटिंग दरम्यान, सेटवरच बाटलीत लघवी करायचा अभिनेता

सेलिब्रिटी(celebrity) आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच अनेक गोष्टींबाबत चाहत्यांना उत्सुकता असते. एवढंच काय तर, त्यांच्याबाबतच्या कॉन्ट्रोवर्सीसुद्धा सर्वांसाठी औत्सुकाचा विषय असतो. अनेक सेलिब्रिटी आपल्या वैयक्तिक आयुष्यासोबतच प्रोफेशनल आयुष्यातील अनेक घटनांमुळे कॉन्ट्रोवर्सीचे शिकार होतात. असंच काहीसं झालंय, प्रसिद्ध हॉलिवूड स्टार ड्वेन जॉनसनसोबत. त्याच्याबाबतची कॉन्ट्रोवर्सी, त्याच्यावरचे आरोप याबाबत आता स्वतः अभिनेत्यानं मौन सोडलंय.

हॉलिवूडचा प्रसिद्ध(celebrity) अभिनेता ड्वेन जॉन्सन त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. काही काळापूर्वी तो वादात सापडला होता. ड्वेन जॉन्सनवर ‘रेड वन’च्या सेटवर उशिरा पोहोचल्याचा आरोप वारंवार केला जात होता. तसेच, त्याच्यावर सेटवर वारंवार, सतत गैरवर्तन केल्याचा आरोपही केला जात होता.

आता खुद्द ड्वेन जॉन्सननं यावार मौन सोडलं आहे. एका मुलाखतीत बोलताना त्यानं सर्व आरोप फेटाळून लावत आपली बाजू सांगितली आहे. तसेच, त्यानं काही गोष्टी मान्यदेखील केल्या आहेत. सध्या ड्वेन जॉन्सनची ही मुलाखत व्हायरल होत आहे.

जीक्यूला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ड्वेन जॉन्सन म्हणाला की, त्याच्याबाबत बोललं जात आहे की, तो सेटवर वारंवार गैरवर्तन करायचा. बाटलीत लघवी करायचा… हो कामच्या व्यापामुळे मी सेटवर बाटलीत लघवी करायचो. मला सेटवर यायला उशिरही झाला आहे. पण, जेवढं सांगितलं जातंय, तेवढा उशिरा नाही व्हायचा.

ड्वेन जॉन्सननं सांगितलं की, हो… मी काम करताना बाटलीत लघवी करतो. त्यानंतर ज्यावेळी त्याला सेटवर उशिरा येण्याबाबत विचारलं, त्यावेळी त्यानं तेसुद्धा कबुल केलं. पण, त्याच्यावर सातत्यानं करण्यात आलेला आरोप, तो सेटवर तब्बल आठ तास उशिरा येत असल्यामुळे प्रोडक्शनचे बरेचसे पैसे बुडाले, हा मात्र त्यानं फेटाळला.

तो म्हणाला की, मी उशिरा यायचो पण, ते म्हणतात तसा 8 तास उशिर मला कधीच झालेला नाही. तसेच, त्याच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळत हा फालतूपणा असल्याचंही तो म्हणाला. तसेच, कित्येक दिवस माझ्यावर हे आरोप केले जात आहेत. मी हजारदा सांगितलंय, मी इथे आहे, या आणि मला विचारा… मी तुम्हाला खरं सांगेन.

‘रेड वन’चे दिग्दर्शक जेक कासडन यांनी पब्लिकेशनला सांगितलं की, ड्वेन जॉनसननं कधीही कामाचा एकही दिवस सोडलेला नाही. ते पुढे म्हणाले की, तो कधी-कधी उशिरा नक्कीच येऊ शकतो. पण हॉलिवूड असंच आहे. असं प्रत्येकासोबतच होतं. ते हेसुद्ध म्हणाले होते की, अभिनेत्याबाबत बऱ्याच गोष्टी बोलल्या जात आहेत. पण, मी स्वतः त्याला सेटवर कधीच चुकीचं वागताना पाहिलेलं नाही.

हेही वाचा :

“शिंदेंच्या सर्व उमेदवारांना 25 कोटी…”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

अजितदादांची चिंता वाढली, भाजपच्या बड्या नेत्याचा घड्याळाविरोधात प्रचाराचा इशारा

प्रेमासाठी काही पण! बायको छतावरून खाली पडताच नवऱ्याने केलं असं… Video Viral