‘श्रीवल्ली’ची 100 किलोंची डेडलिफ्ट पाहून चाहते थक्क!

अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत(dyson fan) स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. ‘गुडबाय’ हा तिचा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट फ्लॉप ठरला. मात्र रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटात काम केल्यानंतर तिची बॉलिवूड इंडस्ट्रीतही जोरदार चर्चा होऊ लागली आहे. रश्मिकाचा सोशल मीडियावरही मोठा चाहतावर्ग आहे. ‘नॅशनल क्रश’ म्हणून ती ओळखली जाते.

इन्स्टाग्रामवर बऱ्यापैकी सक्रिय असलेल्या रश्मिकाने(dyson fan) नुकताच एक फोटो शेअर केला. यामध्ये ती डेडलिफ्ट करताना दिसून येत आहे. या फोटोसोबतच तिने तिचं रुटीनसुद्धा सांगितलं आहे. व्यग्र वेळापत्रक आणि अनेक तासांच्या शूटिंगनंतरही फिटनेसकडे पूर्ण लक्ष देत असल्याचं रश्मिकाने म्हटलंय. रश्मिकाचं 100 किलो डेडलिफ्ट पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

या पोस्टमध्ये तिने लिहिलं, ‘प्रिय डायरी, गेल्या अनेक दिवसांपासून मी रात्रीचं शूटिंग करतेय. त्यामुळे कुठून सुरुवात करावी हेच मला सुचत नाहीये. रात्रीच्या शूटिंगनंतर मी माझ्या रुममध्ये सकाळी 8 वाजता आली. थोडंफार खाल्लं पण मला अजिबात झोप येत नव्हती. त्यामुळे मी पुस्तक वाचायला घेतलं आणि दुपारी 12 च्या सुमारास माझा डोळा लागला. संध्याकाळी 6 वाजता मला जाग आली, तेव्हा मला काही कार्डिओ करावंसं वाटलं. पण मी केलं नाही. त्यामुळे फोनवर थोडंसं काम केलं आणि पुस्तक वाचलं. हे सर्व करताना मला पुन्हा भूक लागली (नेहमीप्रमाणे) त्यामुळे थोडंसा खाऊ खाल्ला.’

‘मध्यरात्री 1 वाजता मी वर्कआऊट करायला गेले. आज 100 किलोंचं डेडलिफ्ट केलं. पायाचेही काही व्यायाम केले. त्यामुळे मला पॉवरफुल झाल्यासारखं वाटलं. त्यानंतर चित्रपट पाहिला आणि आता माझ्या गुडघ्यांनाही चांगला आराम मिळाला आहे. त्यामुळे मी पुन्हा धावण्यासाठी उत्सुक आहे. व्यायामानंतर माझ्या रुममध्ये आले आणि जेवले.

जेवणानंतर शूटिंगसाठी निघाली. धनुष सर, शेखर सर, निकेत आणि कुबेरा यांच्यासोबत शूटिंग करण्यात खूप मज्जा येते. आज 30 तारीख आहे आणि सकाळचे 7 वाजलेत. तरीही मला अजून झोप आली नाही. माझ्या झोपेचं वेळापत्रक पूर्णपणे बिघडलं आहे’, असं तिने पुढे लिहिलंय.

रश्मिका सध्या ‘पुष्पा 2: द रुल’ आणि ‘कुबेर’ या चित्रपटांसाठी शूटिंग करत आहे. याशिवाय ती ‘गर्लफ्रेंड’, ‘छावा’, ‘रेनबो’, ‘ॲनिमल पार्क’, ‘डी 51’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

हेही वाचा :

सांगलीत योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा

“……पक्षाबरोबर आमची अनेक दशकांची युती होती. ती टिकवायची म्हणून….”;पंतप्रधान मोदींचे परखड मत

मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट