नवरात्रीच्या उपवासात 5 सुपरफूड नक्की खा, थकवा अजिबात जाणवणार नाही

नवरात्रीच्या(Navratri) दिवसांत आई दुर्गेची मनोभावे पूजा केली जाते. या दिवसांमध्ये अनेक भाविक नऊ दिवस उपवास करतात. हिंदू धर्मात नवरात्र आणि उपवासाला अनन्य साधारण महत्त्व आहे. अशावेळी उपवास करत असताना भाविकांनी आपली काळजी घ्यावी. उपवासाच्या काळात आहार चांगला असावा.

उपवासाच्या(Navratri) दिवसांमध्ये तुमचा आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे. ते पदार्थ कोणते जाणून घ्या.

उपवासाच्या दिवशी कोणते पदार्थ खावेत?
मखाना
उपवासाच्या दिवसांत मखाना खाल्ला जातो. यामध्ये कार्बोहायड्रेट, मॅग्नेशियम, आयर्न आणि फॉसफोरस यासारखे पोषकतत्व असतात. महत्त्वाचं म्हणजे मखानामुळे पोट भरतं आणि एनर्जी देखील भरपूर मिळते. तसेच मखाना तूपामध्ये थोडे परतूनही तुम्ही खाऊ शकता.

ड्रायफ्रुट्स
मखान्यासोबत इतर पौष्टिक पदार्थांमध्ये सुक्यामेवाचा समावेश येतो. यामध्ये पौष्टिक पोषकत्त्व असून शरीराला ताकद देखील मिळते. यामुळे खूप एनर्जी मिळते. सुकामेवा कच्चा खाण्याबरोबरच ते भाजून किंवा भिजवून देखील खाऊ शकता.

हिरव्या भाज्या
उपवासाच्या दिवसांत अनेक लोक, दुधी, पालक, काकडी, भोपळायासह अनेक हिरव्या भाज्या खाऊ शकता. हिरव्या भाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. या भाज्या तुम्ही उपवासाच्या मीठाने अतिशय चवदार बनवू शकता. अनेकजण उपवासाच्या दिवसांमध्ये हे पदार्थ खातात.

फळं
उपवासाच्या दिवसांमध्ये अनेकजण फक्त फळ खातात. कारण यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. उपवासाच्या दिवशी तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा फळे खाणे कायमच फायदेशीर अशते.

साबूदाणा
अनेकजण साबूदाणा उपवासाच्या दिवशी खाणे पसंत करतात. पचनक्रिया उत्तम राखण्यासाठी साबूदाणा खाल्ला जातो. पण काही लोकांना साबूदाणा किंवा शेंगदाण्यामुळे ऍसिडिटी, गॅस सारखा त्रास होतो.

उपवासात कोणत्या गोष्टी टाळाल?
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अनेकजण उपवास धरतात. अशावेळी काही गोष्टी कटाक्षाने टाळले पाहिजेत. जसे की, तेलकट पदार्थ, ओव्हर इटिंग, गोड पदार्थ खाणे टाळलं पाहिजे.

तसेच या दिवसांमध्ये निर्जल उपवास ठेवू नये. कारण उपवासात मुळातच थकवा आलेला असतो. हा थकवा दूर करण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणे अत्यंत आवश्यक असते.

तसेच औषधं किंवा कोणती खास ट्रिटमेंट सुरु असेल तर उपवास धरणे टाळा.

(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

हेही वाचा :

सणासुदीत Tata Punch ची लिमिटेड एडिशन कार लॉन्च; आकर्षक फीचर्ससह जबरदस्त ऑफर

आप’ मंत्र्याने भाजप आमदाराचे पाय पकडले; व्हिडिओ व्हायरल होताच राजकीय वर्तुळात चर्चा

Grand Finale ची पहिली झलक! सूरज-अभिजीतचा ‘झापुक झुपूक’ डान्सने स्टेजवर धमाल, व्हिडिओ व्हायरल