9 दिवस सलग खा हे 11 पदार्थ, वजन येईल थेट 50 किलोच्या खाली

लठ्ठपणाची समस्या महिलांना अधिकाधिक सतावते आणि एकदा का लठ्ठपणा(foods) मागे लागला की तो कमी करण्यासाठी जास्त वेळ लागतो. पण या उलट पुरुष मात्र अगदी निम्मी मेहनत करून सुद्धा लगेच वजन कमी करतात. हे पाहून तर स्त्रियांना अधिकच जास्त त्रास होतो. सर्वात मोठा त्रास होतो जेव्हा पुरुष त्यांच्यापेक्षा निम्मे कष्ट करून पटकन बारीक होतात. पण हे शारीरिक आणि हार्मोनल फरकांमुळे होते. पण जर योग्य माहिती असेल तर महिला पुरुषांपेक्षा वेगाने वजन कमी करू शकतात तेही महिन्यातून फक्त 9 दिवस कष्ट करून.!

क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. निधी चौधरी यांनी महिलांसाठी वजन(foods) कमी करण्याची ही सर्वोत्तम पद्धत सांगितली आहे. पुरुषांचे वजन कमी वेळेत का कमी होते हेही त्यांनी सांगितले. यामागे हार्मोन्स हे एक प्रमुख कारण आहे, परंतु या माहितीनंतर तुम्ही देखील देखील खूप लवकर वजन कमी करू शकतात. पोट आणि मांड्यांसह संपूर्ण शरीराची चरबी सहज कमी होईल.

महिलांपेक्षा पुरूषांचे वजन वेगाने कमी होते
न्यूट्रिशनिस्ट यांनी सांगितले की जर महिला आणि पुरुषांनी 1 आठवडा आहार घेतला तर त्याचे परिणाम पूर्णपणे भिन्न असतात. कॉफीमध्ये फक्त साखर आणि मलई टाकून पुरुष 10 पौंड (4.5 किलो) वजन कमी करतात. तर महिला सात दिवस दररोज एक तासभर जिममध्ये गेल्या, जेवणातून कार्ब्स काढून टाकले, अल्कोहोल आणि जंक फूड्स सोडले तरीही त्यांचे वजन हे अर्धा किलोने जास्तच दिसते.

महिलांमध्ये जास्त फॅट होते स्टोअर
न्यूट्रिशनिस्ट निधी चौधरी यांनी सांगितले की, महिलांमधील अतिरिक्त चरबीसाठी हार्मोन्स जबाबदार असतात. हार्मोन्समुळे त्यांच्या शरीरात जास्त चरबी साठते जेणेकरून प्रेग्नन्सीमध्ये गर्भधारणा होऊ शकते. यामुळेच लठ्ठपणाही त्यांना लवकर पकडतो.

पुरूषांमध्ये लवकर वेट लॉस होण्याचे कारण
तज्ज्ञांनी सांगितले की पुरुषांच्या शरीरात अधिक लीन स्नायू अर्थात लीन मसल्स असतात. स्त्रियांच्या शरीरात तेवढे लीन मसल्स नसतात. याव्यतिरिक्त, पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी जास्त असते. यामुळे, पुरुष अधिक जलद आणि सहजपणे वजन कमी करतात.

महिलांनी 9 दिवस घ्यावे कॅलरी डाएट
न्यूट्रिशनिस्ट निधी चौधरी यांचा असा दावा आहे की जर महिलांनी दर महिन्याच्या या 9 दिवसांमध्ये त्यांचे डाएट स्ट्रीक्ट केले तर त्यांचे वजन लवकर कमी होईल. तुमची मासिक पाळी संपताच म्हणजे 6 व्या दिवसापासून ते 14 व्या दिवसापर्यंत कमी कॅलरी असलेला आहार घ्या. सोबत चांगला व्यायामही करावा. त्यानंतर संपूर्ण महिनाभर सामान्य आहार आणि व्यायाम सुरू ठेवावा. तुमचे वजन खूप लवकर कमी होईल.

पुढील 11 लो कॅलरी डायट फूड मध्ये कॅलरी आणि फॅट्स कमी आहेत, परंतु पोषण जास्त आहे. या कारणास्तव, त्यांना आपल्या आहारात निश्चितपणे समाविष्ट करा.

  1. फळ
  2. मासे
  3. चिकन
  4. अंडी
  5. ड्राय फ्रुट्स
  6. राजमा
  7. छोले
  8. चिया सीड्स/सब्जा सीड्स
  9. दही
  10. ब्रोकोली
  11. कमी फॅट्स असलेले दूध

डिस्क्लेमर: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हेही वाचा :

धक्कादायक! नव्याने पदवीधर झालेल्या तरूणांच्या नोकऱ्या धोक्यात; काय आहे कारण?

भाजपच्या सभेला ३०० रुपये देऊन रोजंदारीने माणसं? रोहित पवारांनी शेअर केला VIDEO

समांथाच्या फॅशनचा थाटच न्यारा, हटक्या पद्धतीने कॅरी केला वेडिंग गाऊन