एक दम से वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए! आधी वाचवले अन् मग धू धू धुतले, Viral Video

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज एकापेक्षा एक अनेक अजब-गजब व्हिडिओ(Video) व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ लोकांना आश्चर्यचकित करतात, तर काही थक्क करून टाकतात, इथे काही व्हिडिओ असेही असतात जे पाहिल्यानंतर लोकांना आपले हसूच आवरता येत नाही.

तुम्ही सोशल मीडियावर असाल आणि ते रोज वापरत असाल तर असे अनेक व्हिडिओ तुमच्या फीडवर येत असतील. काही व्हिडीओ(Video) जुगाडचे असतील तर काही स्टंटचे असतील आणि काही व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू येईल. आताही असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही हास्याने लोटपोट व्हाल.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये टेरेसच्या बाउंड्रीजवळ काही लोक उभे असल्याचे दिसत आहे जे पोलिस असल्याचे भासत आहेत. त्यांचा ड्रेस खाकी रंगाचा आहे, जे पाहून ते पोलीस असावेत असे वाटते. यावेळी ते एक दोरी खेचताना दिसून आले.

खरंतर या दोरीला एक व्यक्ती बांधलेली असते आणि दोरीच्या साहाय्याने ते लोक या व्यक्तीला वर ओढत असतात. हे सर्व दृश्य पाहता ते त्या व्यक्तीला खाली पडण्यापासून वाचवत असल्याचे समजून येते मात्र पुढच्याच क्षणी असे काही घडते जे पाहून सर्वच आश्चर्यचकित होतात. चला तर मग व्हिडिओत नक्की काय घडते ते सविस्तर जाणून घेऊयात.

तर व्हिडिओत पुढे आपण पाहिले तर यात दिसते की, काही लोक व्यक्तीला दोरीच्या साहाय्याने टेरेसवर खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. असे करण्यात त्यांना यश येते. काही वेळाने त्या व्यक्तीला वर खेचताच त्याला मारायला सुरुवात करतात. ते व्यक्तीची अशाप्रकारे धुलाई करतात की पाहून कुणालाही हसू येईल.

हा व्हिडीओ केव्हा आणि कुठे आहे याबाबत कोणतीही माहिती नाही पण तो मजेदार आहे आणि त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्यक्ती नक्की दोरीला का आणि कसा लटकला याबाबत मात्र कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.

दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @VishalMalvi_ नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘पोलीस काका म्हणतील: वाचवणार पण आम्हीच आणि मारणार पण आम्हीच’ असे लिहिले आहे. अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला असून बऱ्याच जणांनी या व्हिडिओवर कमेंट्स करत या घटनेवर आपल्या मजेदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ते या क्षणाची वाट पाहत होते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आता तर बोलून पण काय उपयोग नाही”.

हेही वाचा :

बस अचानक सुरु झाली अन् पुढं घडलं भयंकर!

धक्कादायक, 4 वर्षात 64 जणांकडून लैंगिक शोषण, किशोरवयीन मुलीच्या दाव्याने सगळेच हादरले

आज ते पप्पी घेत आहेत ठाकरे कुणाचेच नाहीत गुलाबराव पाटील खोचक टीका