‘सूरतला गेल्यावर ठाकरेंकडून मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर’, एकनाथ शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट

सूरतला गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाची(minister) ऑफर देण्यात आल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्रिपदाची ऑफर स्वीकारली नाही, म्हणून ठाकरे यांनी भाजप नेत्यांना फोन केल्याचंही शिंदे आपल्या मुलाखतीदरम्यान म्हणाले आहेत. ते म्हणाले आहेत की, मविआ सरकारच्या काळात अनेक भाजप नेत्यांना अटक करण्याचा डाव होता.

उद्धव ठाकरे यांनी तुमच्यात वाद कधी झाला, असा प्रश्न त्यांना या मुलाखतीत विचारण्यात(minister) आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले की,” त्यांनी मला वर्षाला बोलावून तासनतास थांबायला लावलं. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी मला बाहेर ठेवण्यात आले. माझ्याकडून नगरविकास खाते काढून घेण्याचा त्यांचा डाव होता. नक्षलवाद्यांकडून धमकी असूनही त्यांनी मला झेड प्लस सुरक्षा दिली नाही.”

ते म्हणाले, ”त्याआधीही मी त्यांना अनेकवेळा सांगितले होते की, आम्ही युती करून निवडणूक लढवली असल्याने आम्ही पुन्हा भाजपमध्ये जावे. खरे तर उद्धव यांनी त्याला हो म्हटले होते. मविआ सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि आठ दिवसांत निर्णय घेण्यास सांगितले. मात्र त्यांनी निर्णय घेण्याऐवजी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला.”

उद्धव ठाकरे म्हणाले होते की, मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. मात्र मविआ नेत्यांची मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून आग्रह धरला होता. यामुळे मविआ सरकार स्थापन व्हावं म्हणून मी मजबुरीत मुख्यमंत्री झालो. यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,”उद्धव ठाकरेंना नेहमीच मुख्यमंत्री व्हायचे होते. हे त्याचे स्वप्न होते. ज्या दिवशी 2019 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, त्या दिवशी त्यांनी दावा केला की, त्यांनी सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. उद्धव ठाकरे यांना संपूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री व्हायचे होते आणि मुख्यमंत्रीपद ठाकरे कुटुंबाकडेच ठेवायचे होते.”

हेही वाचा :

माझा ‘तो’ प्लॅन यशस्वी झाला,  शरद पवारांनी सगळंच सांगितलं!

आता फक्त ३९९! लोकसभा निवडणुकीत भाजपने उघडलं खातं

भर मैदानात हिटमॅनला किस करण्याचा प्रयत्न : Video Viral