भूमिपुत्राला निवडून द्या, कोल्हापूरचं पार्सल परत पाठवा, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला 

चंद्रकांत मोकाटे हे भूमिपुत्र आहे. भूमिपुत्राला निवडून आणायचं की कोल्हापूरचं(political news) पार्सल परत पाठवण्याचं हे कोथरुडकरांच्या हाती आहे, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला. राज्यात खूप प्रश्न आहेत.

पुण्यात कोयता गँगचे म्होरके निवडणुकीला (political news) उभे असल्याचेही राऊत म्हणाले. 23 तारखेला आमदार म्हणून मुंबईत या असेही राऊत मोकाटे यांना म्हणाले. दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल असे राऊत म्हणाले.

भीती वाटणाऱ्याला उपद्व्याप करावे लागतात, पैसे वाटावे लागतात. अंगठ्या द्याव्या लागतात असेही संजय राऊत म्हणाले. कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांच्या कार्यालयात संजय राऊत आले होते. यावेळी ते बोलत होते.

आज चंद्रकांत मोकाटे यांचा वाढदिवसाच आहे. त्यानिमित्त संजय राऊत यांच्या उपस्थित मोकाटे यांनी केक कापत वाढदिवस साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा दिल्या. संजय राऊत आज पुण्यातील मतदारसंघात धावत्या भेटी देत आहेत. पुण्यात येऊन जा असा अनेकांचा आग्रह होता. पैसे, अंगठ्या कुठं वाटतयात याकडं लक्ष ठेवायचं आहे, असेही राऊत म्हणाले.

शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला होता. शिवसेनेकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे व शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार हे इच्छुक होते. मात्र, मोकाटे यांना पक्षाने संधी दिली आहे. मनसेकडून अॅड. किशोर शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे या मतदारसंघात तुल्यबळ नेता नसल्याने पुन्हा एकदा चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघाच तिहेरी लढत होणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभीवर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुराळा उडवला आहे. मतदानासाठी पाच दिवस उरले आहेत. त्यामुळं वेगानं प्रचार सुरु आहे. अशातच राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. सत्ताधारी पुन्हा सत्तेत येण्याचा दावा करत आहेत. तर विरोधाक महाराष्ट्रात परिवर्तन होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत आहे. त्यामुळं राज्यात कोणाची सत्ता येणार 23 नोव्हेंबरलाच समजणार आहे.

हेही वाचा :

कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!

‘मुख्यमंत्री होणं माझ्यासाठी..’; CM पदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा सर्वात मोठा खुलासा

भारतीय संघात मोठी फूट? विराट एकटा पडलाय? रोहित आणि गंभीरबरोबर…