निवडणूक आयोग मालामाल! मतदानाआधीच पावणेपाच हजार कोटी ताब्यात
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत(good). देशभरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारांची घोषणा, अर्ज दाखल करण्याची धावपळ, बंडखोरी, प्रचार सभा, नाराजीनाट्य, भेटीगाठी, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अशा सर्व घडामोडींमुळे सुरू आहे. त्यामुळे देशात निवडणुकीपूर्वी वातावरण चांगले तापले आहे. राजकीय माहोल तयार होत असतानाच लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने एक महत्त्वाची माहिती शेअर केली आहे.
देशात सात टप्प्यांत मतदान होणार असून(good), आचारसंहिता लागू झाल्यापासून पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडण्याआधीच कारवायांसंदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत सांगितले आहे की, निवडणूक आयोगाकडून 1 मार्चपासून सरासरी दररोज 100 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी एकूण 4,650 कोटी रुपयांची रोकड, ड्रग्ज आणि दारू जप्त केली असून, एकूण जप्तीपैकी 45 टक्के अमली पदार्थांचा वाटा आहे. 1 मार्चपासून झालेल्या कारवाईमुळे 2019 च्या संसदीय निवडणुकीत जप्त केलेल्या 3,475 कोटी रुपयांचा आकडादेखील या वेळेस पार केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या 75 वर्षांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी जप्ती असून, गेल्या लोकसभा निवडणुकीत 2019 मध्ये आयोगाने 3475 कोटी रुपये जप्त केले होते. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये एकूण 7502 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. अशाप्रकारे जानेवारी ते 13 एप्रिलपर्यंत एकूण 12 हजार कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या रिपोर्टनुसार तपासणीदरम्यान दररोज सुमारे 100 कोटी रुपये जप्त करण्यात येत आहेत. 1 मार्चपासून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये 2068.85 कोटी रुपयांची ड्रग्ज, 1142.49 कोटी रुपयांच्या वस्तू, 562.10 कोटी रुपयांची मौल्यवान धातू, 489.31 कोटी रुपयांची रोकड आणि 395.39 कोटी रुपयांची रोकड यांचा समावेश आहे.
हेही वाचा :
साताऱ्याची बहुप्रतीक्षित उमेदवारी अखेर जाहीर, उदयनराजे भोसलेंना भाजपचं तिकीट
सलमानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या 2 शार्प शुटर्सला अटक; गुजरात कनेक्शन आलं समोर
एकटा पडलाय रोहित शर्मा? ‘हिटमॅन’चा Viral Video पाहून तुमचेही डोळे पाणावतील!