निवडणूक आयोगाचा ठाकरे गटाला झटका

ठाकरे गटाच्या प्रचार गीताचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. निवडणूक आयोगाने(hits) बजावलेल्या नोटीसमधील आक्षेपावर फेरविचार करावा, असा अर्ज ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आला होता. हा अर्ज राज्यातील केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यातील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यम प्रमाणपत्र आणि देखरेख समितीने ठाकरे गटाचा(hits) हा फेरविचार अर्ज फेटाळला आहे, उच्चपदस्थ सूत्रांनी याबाबत माहिती दिलीये. फेरविचार अर्ज फेटाळल्याने आता या प्रकरणी ठाकरे गटाला मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाद मागावी लागणार आहे.

निवडणूक आयोगाने २४ एप्रिल २०२३ रोजी एक सूचना जारी केली. यामध्ये विविध कारणांसाठी काही पक्षांना ३९ नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. यामध्ये ठाकरे गटाच्या प्रचार गितासाठी देखील नोटीस बजावण्यात आली. यातील जय भवानी शब्द वगळा असे सांगण्यात आले आहे.

मात्र ठाकरे गटाने यावरून आक्रमक भूमिका घेतलीये. तसेच प्रचार गीतातील कोणताही शब्द वगळणार नाही असं म्हटलं आहे. आपल्या मतावर ठाम राहत ठाकरे गटाकडून फेरविचार अर्ज करण्यात आला होता. हा अर्ज देखील आता फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे त्यामुळे आता ठाकरे गटाकडून फेरविचार याचिका दाखल करण्यात येणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

प्रचार गीतात कोणत्याही धार्मिक शब्दाचा उल्लेख असू नये, असं नोटीसमध्ये म्हटलं आहे. यामध्ये’जय भवानी’ शब्दाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाने ‘जय भवानी’ या शब्दावर आक्षेप घेतल्याचं म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंनी दोनवेळा आपल्या भाषणातून ‘जय भवानी’ शब्दावर अक्षेप घेतला असला तरी आम्ही तो बदलणार नाही, असं स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे.

हेही वाचा :

‘माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे’, दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज

‘मी वावरात आहे, पाकीट घरी विसरलोय, 600 रूपये पाठव…’ धोनीचा मेसेज आला असेल तर सावधान! 

iPhone 13 वर मिळत आहे जबरदस्त ऑफर, 128GB मॉडेल स्वस्तात खरेदी करण्याची संधी