Elon Musk देणार नोकरी, डिग्रीचीही गरज नाही, इथे करा अर्ज

टेक जगतातील दिग्गज उद्योजक आणि टेस्ला, स्पेसएक्सचे संस्थापक इलॉन मस्क(Elon Musk) यांनी एका खास जॉब ऑफरची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे, या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांना कोणत्याही पदवी किंवा अनुभवाची अट नाही. “तुमच्या पदवी किंवा अनुभवाने आम्हाला फरक पडत नाही, फक्त तुम्ही उत्तम काम करणे महत्त्वाचे आहे,” असे मस्क(Elon Musk) यांनी स्पष्ट केले आहे.

इलॉन मस्क यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) या जॉब ऑफरबद्दल माहिती दिली आहे. ते एक नवीन अॅप विकसित करत आहेत ज्याचे नाव ‘एव्हरीथिंग अॅप’ असे असेल. हे अॅप सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अशा दोन्ही प्रकारच्या सुविधा प्रदान करेल. याच अॅपच्या निर्मितीसाठी मस्क यांना कुशल सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची आवश्यकता आहे.

या जॉब ऑफरबद्दल अधिक तपशील आणि अर्ज करण्याची पद्धत इलॉन मस्क लवकरच ‘एक्स’वर जाहीर करतील. इच्छुकांनी मस्क यांच्या ‘एक्स’ अकाउंटवर लक्ष ठेवावे.

मस्क यांची ही जॉब ऑफर अशा तरुणांसाठी मोठी संधी आहे ज्यांच्याकडे औपचारिक पदवी किंवा अनुभव नसला तरी त्यांच्याकडे उत्तम कौशल्य आणि काम करण्याची जिद्द आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 14 वर्षांचा तुरूंगवास

अरविंद केजरीवाल यांचे पुन्हा एकदा पत्र; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली ‘ही’ मोठी मागणी

गुगलवर चुकूनही सर्च करू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा खावी लागेल जेलची हवा