“महिला अत्याचारांना आता पूर्णविराम द्या” : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आवाहन
नवी दिल्ली – देशभरात महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांवर राष्ट्रपती (President)द्रौपदी मुर्मू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “आता पुरे झाले” अशा शब्दांत त्यांनी या घटनांचा निषेध केला असून, अशा घटनांना आता पूर्णविराम देण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे.
कोलकाता येथील डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेचा संदर्भ देत मुर्मू यांनी आपल्या हळहळ व्यक्त केली. “कोणताही सुसंस्कृत समाज मुली आणि बहिणींवर असे अत्याचार होऊ देऊ शकत नाही,” असे त्या म्हणाल्या. बदलापूरमधील बालवाडीतील मुलींवरील अत्याचाराचाही त्यांनी उल्लेख केला.
राष्ट्रपतींनी निर्भया घटनेनंतरही अशा घटना थांबल्या नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. “सामूहिक स्मृतिभ्रंश” या शब्दांत त्यांनी समाजाच्या या उदासीनतेवर बोट ठेवले. महिलांना कमी लेखणाऱ्या मानसिकतेला आता आव्हान देण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या.
राष्ट्रपतींच्या या संतप्त प्रतिक्रियेमुळे महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा:
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पतनानंतर राजकीय वादंग, नौदल तपास सुरू, काँग्रेस आक्रमक
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
संतापजनक: रुग्णालयाच्या आवारात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार