20 ओटीटी प्लॅटफॉर्मची मजा आता ‘या’ अॅपवर! केवळ 400 रुपयांत 3 महिन्यांचा अॅक्सेस

तुम्ही सिनेमे आणि वेब सिरीज पाहण्यासाठी वेगवेगळे ओटीटी अॅप्स डाऊनलोड करून त्यांचं सबस्क्रिप्शन खरेदी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला ओटीटी(OTT) अॅप्सची मजा घेण्यासाठी अनेक अॅप्स डाऊनलोड करण्याची गरज नाही. तुम्ही एकाच अॅपमध्ये Disney+Hotstar पासून Sony LIV पर्यंत 20 ओटीटी प्लॅटफॉर्मची मजा घेऊ शकता आणि यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची देखील गरज नाही.

तुमचे आवडते चित्रपट, शो किंवा वेबसिरीज पाहण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या ओटीटी(OTT) अॅप्सचे सबस्क्रिप्शन खरेदी करावं लागते, ज्यामध्ये खूप पैसे खर्च केले जातात, पण स्ट्रीमबॉक्स मीडियाने आता सर्व युजर्सच्या समस्येवर एक उपाय आणला आहे. कंपनीने असे एक ओटीटी अॅप आणले आहे, जे युजर्सना एका रिचार्जमध्ये 20 हून अधिक ओटीटी अॅप्सचे सबस्क्रिप्शन देते.
स्ट्रीमबॉक्स मीडियाने डोर प्ले अॅप लाँच केले आहे. ज्यामध्ये तुम्ही 20 हून अधिक ओटीटी अॅप्स आणि 300 हून अधिक टीव्ही चॅनेल पाहू शकता. ही भारतातील पहिली सबस्क्रिप्शन आधारित टेलिव्हिजन सेवा आहे. याचा युजर्सना बराच फायदा होणार आहे आणि त्यांचे पैसे देखील वाचणार आहेत.
डोरप्ले ओटीटी प्लॅटफॉर्मची किंमत 400 रुपयांपेक्षा कमी आहे. म्हणजेच, 400 रुपयांपेक्षा कमी किमतीत, तुम्ही पूर्ण 90 दिवसांसाठी 20 ओटीटी प्लॅटफॉर्मचा आनंद घेऊ शकता. तुम्ही प्ले स्टोअरवरून डोरप्ले अॅप डाउनलोड करू शकता. हे मनोरंजन अॅप स्ट्रीमबॉक्सने लाँच केले आहे. या अॅपद्वारे तुम्ही 20 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्मच नाही तर 300 हून अधिक टीव्ही चॅनेलचा आनंद घेऊ शकता.
डोरप्ले प्लॅटफॉर्मवर, तुम्हाला डिस्ने+ हॉटस्टार, झी5, सोनी लिव्ह, लायन्सगेट प्ले, सन एनएक्सटी, आहा, डिस्कव्हरी+, फॅनकोड, ईटीव्ही विन, चौपाल, डॉलिवूड प्ले, नम्माफ्लिक्स, शेमारूमी, स्टेज, सन एनएक्सटी, ट्रॅव्हलएक्सपी, राज टीव्ही, व्हीआर ओटीटी, प्लेफ्लिक्स, ओटीटी प्लस आणि डिस्ट्रोटीव्ही प्लॅटफॉर्म आणि 300+ टीव्ही चॅनेल उपलब्ध आहेत.
याशिवाय, कंपनीचे म्हणणे आहे की त्यांच्या प्लॅटफॉर्मवर 300 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेलचा अॅक्सेस देखील उपलब्ध असेल. डोरप्लेमध्ये युनिव्हर्सल सर्च फीचर दिले आहे. ज्यामुळे एकाच ठिकाणी ओटीटी कंटेंट शोधता येतो आणि अॅक्सेस करता येतो. इतकेच नाही तर वापरकर्त्यांना ट्रेंडिंग आणि अपकमिंग सारखे विभाग देखील मिळतील. या वैशिष्ट्यांमुळे तुम्हाला नवीनतम कंटेटची माहिती मिळेल.
तुम्ही फक्त 399 रुपये देऊन डोर प्लेचे सदस्यत्व घेऊ शकता. वापरकर्त्यांना ही सेवा 399 रुपयांमध्ये 3 महिन्यांसाठी मिळेल. तुम्ही फ्लिपकार्टवरून या ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये प्रवेश खरेदी करू शकता. जर तुम्ही फ्लिपकार्टवरून ते खरेदी केले तर तुम्हाला यासाठी एक कूपन मिळेल. ज्याद्वारे तुम्ही या प्लॅटफॉर्मवर लॉग इन करू शकाल.
हेही वाचा :
घराचे लाईटबिल कमी करण्यासाठी ‘ही’ ट्रिक वापरा
स्वस्तात मस्त परदेशवारी! ‘या’ 5 देशांची ट्रीप करा कमी बजेटमध्ये
राज्यात थंडी गायब होऊन उन्हाचा तडाखा वाढला; हवामान विभागाने ‘हा’ महत्वाचा दिला इशारा