गूढ आजाराची एन्ट्री! 17 जणांचा मृत्यू, अख्खं गाव कँटोनमेंट झोन घोषित

एचएमपीव्ही व्हायरसच्या धक्क्यातून सावरत असतानाच जम्मू काश्मीर राज्यात गूढ आजाराची(disease) एन्ट्री झाली आहे. या आजाराचा फैलाव पाहता येथील लोकांना पुन्हा कोरोनाचे दिवस आठवू लागले आहेत. या गंभीर आजाराने राजौरीतील बंधाल गावात 17 लोकांचा मृत्यू झाला आहे.

मयत सर्व वेगवेगळ्या परिवारातील आहेत(disease). हा आजार नेमका काय आहे याची ठोस माहिती अजून मिळालेली नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने या संपूर्ण गावालाच कंटेनमेंट झोन घोषित केले आहे.

कंटेनमेंट झोन घोषित झाल्यानंतर या गावातील लोक कोणताही मोठा किंवा खासगी कार्यक्रम, समारोह आयोजित करू शकणार नाहीत. कोणत्याही कार्यक्रमात त्यांना सहभागी होता येणार नाही. या आजाराने येथे 17 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एक व्यक्ती या आजाराने ग्रस्त असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या रुग्णाला तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

राजौरी जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी राजीव कुमार खजुरिया यांनी याबाबत आदेश दिले आहेत. गावाची तीन नियंत्रण क्षेत्रात विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या क्षेत्रात ज्या परिवारातील लोक मृत्यू पावले आहेत त्यांचा समावेश आहे. गूढ आजार असलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना दोन नंबरच्या झोनमध्ये ठेवण्यात येईल. या लोकांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येईल. या लोकांना राजौरीतील सरकारी मेडिकल कॉलेजात ट्रान्सफर केले जाईल.

या व्यतिरिक्त कंटेनमेंट झोन तीन तयार करण्यात आला आहे. यामध्ये उर्वरित घरांना कव्हर करण्यात येईल. या सर्व झोनमध्ये राहत असलेल्या लोकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यासाठी कर्मचारी नियुक्त केले जातील. आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी येथे पोलीस कर्मचारी देखील तैनात केले जातील. आजाराने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या घरांना सील करण्याची तयारी प्रशासनाकडून केली जात आहे.

यानंतर कुटुंबातील सदस्यांसह कुणालाही घरात जाण्याची परवानगी राहणार नाही. घर सील केल्यानंतर फक्त अधिकृत कर्मचारी आणि अधिकारीच त्या घरात प्रवेश करू शकतील अशी माहिती देण्यात आली. दरम्यान, हा आजार नेमका काय आहे? कशामुळे फैलावतो? आजार धोकादायक आहे का? संसर्गजन्य आहे का? याची ठोस माहिती अजूनही मिळालेली नाही. त्यामुळे या आजाराबाबत येथे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा :

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

अरविंद केजरीवालांची भाजपवर टीका; म्हणाले, “कमळाचे बटण दाबले की घरी…”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या डोक्यात नक्की काय?, म्हणाले नवीन रुग्ण मिळाला की ऑपरेशन…