नेट पॅक नसेल तरी ऑनलाईन पैसे पाठवता येणार!
आजकाल सर्वच नागरिक ऑनलाईन पेमेंट(money online) करण्याला प्राधान्य देतात. कारण सध्या युनिफाईड पेमेंट इंटरफेस पेमेंटचा (UPI) वापर सर्वात जास्त होत आहे. तसेच ही व्यवहाराची प्रक्रिया सुरक्षित आहे. मात्र आता युपीआयचा वापर झपाट्याने वाढला आहे. अशातच आता अजून एक मोठी अपडेट्स आली आहे.
युपीआयचा वापर सर्वात जास्त स्मार्टफोन धारकांना होत आहे. मात्र आता विना इंटरनेट सुद्धा युपीआयाच वापर करता येणार आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने UPI 123Pay ही सुविधा देखील सुरु केली आहे. मात्र त्याआधारे साध्या मोबाईलवरून सुद्धा पेमेंट(money online) करता येणार आहे. त्यामुळे आता विना इंटरनेट UPI 123Pay च्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपयांपर्यंत व्यवहार करता येणार आहे.
ज्या युझर्सकडे स्मार्टफोन नाही ते IVR च्या माध्यमातून व्हॉईस पेमेंट देखील करू शकतात. मात्र त्यासाठी आता एका IVR क्रमांकावर कॉल करावा लागणार आहे. त्यानंतर कीपॅडवरून योग्य पर्याय निवडून पेमेंट करावे लागणार आहे.
आता प्रॉक्सिमिटी साऊंड-बेस्ड पेमेंट देखील करता येणार आहे. त्यामुळे आता एका खास टोनद्वारे हे पेमेंट देखील करता येईल. मात्र त्यासाठी फोनमधील POD चा वापर देखील करता येईल. त्यानंतर कीपॅडवरून योग्य पर्याय निवडून आता पेमेंट करावे लागेल.
त्यानंतर युझर मिस्ड कॉल देऊन पेमेंट देखील करू शकतात. त्यासाठी नागरिकांना एका नंबरवर कॉल करावा लागणार आहे. त्यामुळे कॉल आल्यावर तुमचा UPI PIN टाकून व्यवहार पूर्ण होतील.
हेही वाचा :
सांगली हादरली! भाजप नेत्याची भररस्त्यात कुऱ्हाडीने वार करत हत्या
नागरिकांना पुन्हा लावावे लागणार मास्क, कारण…
निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं