“अंतर्वस्त्राचे पैसेही…”; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी “उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत(political news) दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं” असा खळबळजनक आरोप केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, यावर आता विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

बंदरविकास मंत्री नितेश राणे यांनी यावर प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे(political news) आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, “उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब आजपर्यंत स्वतःच्या पैशाने जेवलेले देखील नाहीत. ते हॉटेलचं बीलही देत नाहीत. त्यांच्या घरातील एसीदेखील व्हिडिओकॉनचा होता, म्हणून राजकुमार धूत यांना खासदारकी दिली होती.”
संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हेंच्या आरोपांना विरोध केला होता. यावर नितेश राणे यांनी प्रत्युत्तर देत म्हटले की, “संजय राऊत यांना हे वक्तव्य झोंबणारचं… कारण उद्धव ठाकरे जर मर्सिडीज घेत असतील, तर संजय राऊत स्वतःसाठी मारुती मागतात. त्यामुळे त्यांना याचा त्रास होणारचं. मालकाला मर्सिडीज द्या आणि नोकराला मारुती कार द्या, अशीच यांची पद्धत आहे.”
राणेंनी पुढे आरोप करत सांगितले की, “ठाकरे कुटुंब बाहेरगावचे तिकीट किंवा अंतर्वस्त्राचे पैसेसुद्धा स्वतः देत नाही. मी दुकानाचं नावसुद्धा सांगू शकतो. त्यांच्या घरातील लाँड्री देखील लीला हॉटेलमधून केली जाते आणि त्यावर ‘यादव’ नाव दिले जाते.”
राणेंनी राऊतांना थेट इशारा देत म्हटले की, “जर तुम्ही उद्धव ठाकरेंच्या संपत्तीबाबत आणखी काही बोलले, तर मी अजून माहिती देईन. अजून खुलासा करायचा असेल, तर मी उद्धव ठाकरेंच्या गाड्या, कपडे, त्यांचं जेवण कुठून येतं हे सर्व सांगू शकतो. त्यामुळे मला तोंड उघडायला लावू नका.”
हेही वाचा :
‘उद्धव ठाकरे हा तर टक्कापुरुष’; ज्योती वाघमारेंची उद्धव ठाकरेंवर टीका
सांगली ‘कोयताकांड’ने हादरली, नवऱ्याने गळ्यावर कोयत्याने वार करत बायकोला संपवलं
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी!