बाजार घसरला तरी ‘हा’ शेअर अप्पर सर्किटला; 15% उसळीत गुंतवणूकदार खुश!

डी-मार्ट या ब्रँड नावाने स्टोअर्स चालवणाऱ्या राधाकिशन दमानी यांच्या रिटेल कंपनी असलेल्या एव्हेन्यू सुपरमार्ट्सच्या शेअर्समध्ये (stock market)बऱ्याच काळानंतर मोठी उसळी पाहायला मिळाली आहे.

3 जानेवारी 2025 रोजी आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात, एव्हेन्यू सुपरमार्ट्सचे शेअर 15 टक्क्यांनी वाढले आहे. एका दिवसात कंपनीचा शेअर 15 टक्के किंवा 554 रुपयांनी वाढून, 4165 रुपयांवर पोहोचला आहे. त्यानंतर आता कंपनीच्या(stock market) स्टॉकने अप्पर सर्किटला धडक मारली आहे.
एव्हेन्यू सुपरमार्ट्सने आर्थिक वर्ष 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ज्यामुळे डी-मार्टचा स्टॉक आजच्या सत्रात रॉकेट बनला आहे. क्विक कॉमर्स कंपन्यांकडून आव्हान असूनही, कंपनीने उत्कृष्ट परिणाम सादर केले. ज्यामुळे कंपनीचा हा स्टॉक हिरव्या निशाणीवर परत आला आहे.
दरम्यान, तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल 17.5 टक्क्यांनी वाढून, 15565.23 कोटी झाला आहे. जो मागील वर्षीच्या कालावधीतील तिमाहीत गेल्या आर्थिक वर्षात 13,247.33 कोटी रुपये इतका नोंदवला गेला होता. 31 डिसेंबर 2024 पर्यंत कंपनीची देशभरात एकूण 387 स्टोअर्स असणार आहेत.
शुक्रवारी 3 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात घसरण झाली असली तरी, एव्हेन्यू सुपरमार्ट्सच्या शेअरमध्ये जोरदार वाढ झाली आहे. शेवटच्या सत्रात शेअर 3611 रुपयांवर बंद झाला होता. जो 15 टक्क्यांहून अधिक उसळीसह 4166 रुपयांवर पोहोचला आहे.
शुक्रवारी बाजार बंद होण्याच्या सुमारास हा शेअर ११.४३ टक्क्यांच्या वाढीसह ४०२४ रुपयांवर व्यवहार करत आहे. हा शेअर ५९०० रुपयांच्या उच्चांकावरून जवळपास ४० टक्क्यांनी घसरला होता.
अव्हेन्यू सुपरमार्ट्सच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर, विदेशी ब्रोकरेज हाऊस सीएलएसएने आउटपरफॉर्म रेटिंग दिले आहे. आणि 5360 रुपयांच्या लक्ष्यासाठी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, मॉर्गन स्टॅनले आणि मॅक्वेरी यांनी वेटेज कमी करून 3700 रुपयांचे टार्गेट दिले आहे.
डीमार्ट हे डिस्काउंट रिटेलर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी किमतीत वस्तू उपलब्ध होत असल्याने विक्री वाढण्यास मदत होत आहे. यामुळे डी-मार्टला अत्यंत संवेदनशील बाजारपेठेतील बाजारातील हिस्सा वाढवण्यास मदत झाली आहे. सीएलएसएने आपल्या एका अहवालात म्हटले आहे की, डी-मार्ट ही भारतातील 500 अब्ज डॉलर अन्न आणि किराणा मालाच्या बाजारपेठेतील एक मोठी स्पर्धक कंपनी आहे.
सध्या ही जागा छोट्या विक्रेत्यांनी व्यापली आहे. सीएलएसएचा विश्वास आहे की, पुढील 25 वर्षांत TAM 2.3 ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढेल. ज्यामध्ये डी-मार्टचा हिस्सा सध्याच्या 1 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हेही वाचा :
दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी कधी? एकाच टप्प्यात निवडणुका तर १५ फेब्रुवारीनंतर निकाल
बहिणींचा लाडकी-नावडती भेद मिटवा”: राज ठाकरेंची सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त भावनिक पोस्ट
चाणक्य नीती : ‘या’ गोष्टींची घ्या काळजी, देवी लक्ष्मीचा राहील आशिर्वाद